कुरंडीमाल/चक येथे आदिवासी दिनी रॅलीचे आयोजन
एस.के.24 तास
आरमोरी : तालुक्यातील मौजा कुरंडीमाल व कुरंडीचक ह्या दोन्ही गावांनी मिळून आदिवासी दिनाचे औचित्य साधून एकत्रितरित्या भव्य रॅली काढली. या रॅलीमध्ये भारत सरकारच्या *मेरी मिट्टी, मेरा देश* ह्या उपक्रमाला पाठिंबा देत सरकारच्या आदिवासीविरोधी धोरणांचा निषेध घोषणा व प्रदर्शनाच्या माध्यमातून करण्यात आला. मणीपूर येथील घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी या रॅलीमध्ये सहभागी सर्वांच्या हातामध्ये दिवा किंवा मेनबत्ती होती हे विशेष.
कुरंडीचक येथे रॅली पोचताच सभेत रुपांतर होवून मान्यवरांची भाषणे व गाणी,नृत्य व आदिवासींच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमासाठी कुरंडीमाल/चक व परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.