महाराष्ट्र कॉंग्रेस कमेटी तर्फे ३ सप्टेंबर २०२३ पासून सुरु " जनसंवाद पदयात्रा " बैठक पार पडली.
एस.के.24 तास
नागपूर : महाराष्ट्र कॉंग्रेस कमेटी तर्फे ३ सप्टेंबर २०२३ पासून सुरु होणार्या "जनसंवाद पदयात्रा" संबंधीत आज नागपूर येथे पुर्व विदर्भाच्या प्रमुख नेत्यांशी पदयात्रा संबंधित पुर्वतय्यारी बैठक पार पडली.
तसेच प्रत्येक जिल्ह्य़ातील जिल्हाध्यक्ष यांना पदयात्रेतील मुद्दांबाबत मा. प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी सुचना केल्या.
या बैठीकत माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार जी, माजी केंद्रीय मंत्री सतीशबाबु चतुर्वेदी , माजी मंत्री व आमदार नितीन राऊत,माजी मंत्री आमदार सुनील केदार,माजी मंत्री राजेंद्र मुळक,आमदार रणजित कांबळे,आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजीत वंजारी,आमदार,प्रतिभाताई धानोरकर,आमदार सहशराम केरोटे,आमदार राजु पारवे,आमदार सुधाकर अडबाले,आ.सुभाष धोटे जी,माजी मंत्री अनिस अहमद,नाना गावंडे,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील मारकवार,अन्य आजी माजी आमदार,राज्याचे पदाधिकारी, जिल्हातील, शहरातील पदाधिकारी उपस्थित होते.