विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी अतुल भाऊंची धावपळ सुरू.
★ येत्या काही दिवसात ब्रह्मपुरी आगारात मानव विकासच्या सहा गाड्या होणार दाखल.
अमरदीप लोखंडे ,सहसंपादक.
ब्रम्हपूरी : दिनांक,२९/०८/२३ ब्रह्मपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर हे ब्रह्मपुरीचे असल्यामुळे ब्रह्मपुरी तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, स्त्रिया, विद्यार्थी, अंध, अपंग अशा सर्व घटकातील जनतेच्या समस्यांशी परिचित आहेत. गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांच्या बससमस्येबाबत वारंवार सूचना कानावर येत असतांना आगष्ट 28 रोजी आपल्या कार्यकर्त्यांसह थेट विद्यार्थ्यांना घेऊन आगार व्यवस्थापक नितीन झाडे यांच्या कार्यालयात दाखल झाले.
ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थी बससेवेच्या अनियमिततेमुळे अनेकदा शाळेला मुकावे लागत आहे. त्यांचे शैक्षणिक नुकसान हे न भरून निघणारे आहे. प्रा. अतुल भाऊंनी आगार प्रमुख झाडे आणि सहाय्यक वाहतूक निरीक्षक श्री. देठे यांचे जवळ बस सेवेच्या अनियमिततेबद्दल विषय मांडला.मात्र झाडे यांनी बसेस कमतरतेमुळे अडचण निर्माण होत असल्याचे स्पष्ट केले. यावेळी भाऊंनी विभाग नियंत्रक सुतवणे यांच्याशी दूरध्वनीवरून संभाषण करून ब्रह्मपुरी आगाराला अतिरिक्त सहा गाड्या मानव विकासच्या उपलब्ध करून देण्याबाबत सूचना केल्या. सुतवनेने देखील या संदर्भात होकार दर्शवला.
नंतर अतुल भाऊंनी आपला सर्व ताफा घेऊन एसडिओ कार्यालयात नेला. उपविभागीय अधिकारी संदीप भस्के साहेबांकडे आल्यानंतर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी माणिक खुणे यांना देखील बोलाविण्यात आले. आणि बस सेवेच्या अनियमिततेबद्दलची गंभीरता विशद करण्यात आली. यावेळी माणिक खुणे यांनी देखील आपण वाढीव गाड्यांचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवला असल्याबाबत सांगितले.परंतु त्याला गती आली नाही. एसडीओंच्या माध्यमातून कलेक्टरला माहिती देण्यात यावी अशी सूचना प्रा.अतुलभाऊ देशकर यांनी केली. उपविभागीय अधिकारी यांनी देखील तत्परता दाखवत यासाठी आपण सर्व सहकार्य करू असे आश्वासन दिले.
आणि त्यामुळे इथे काही दिवसात मानव विकासच्या सहा बसेस ब्रह्मपुरी आगारात दाखल होऊन विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर होणार आहे यावेळस भाऊंसोबत प्रा. रामलाल महादेव दोनाडकर तालुकध्यक्ष भाजयुमो ब्रह्मपुरी तालुका तथा अध्यक्ष, संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती ब्रह्मपुरी,युवा उपसरपंच गोपाल जी ठाकरे जुगनाळा, भाजपा कार्यालय मंत्री प्रा.संजय लांबे नानाजी गराडे,शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनींनी उपस्थित होते.