माझी शाळा - माझे उपक्रम शालेय मंत्रिमंडळ स्थापन,शपथविधी आणि उपक्रमांचा वार्षिक आराखडा तयार
★ जि.प.उ.प्राथ.शाळा,खेमजई बिट-शेगाव(बु.) पं.स.वरोरा
एस.के.24 तास
चिमुर : निवडणुकीद्वारे 2023-2024 या सत्रासाठी शालेय मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आले.यात 1) कु.श्रावणी चौधरी वर्ग 7वा (मुख्यमंत्री) 2) ओम कापटे वर्ग 7वा (उपमुख्यमंत्री) 3) कु.भाविका घरत वर्ग 6वा (शिक्षणमंत्री) 4) कु.मेघा चौधरी वर्ग 7वा (सांस्कृतिक मंत्री) 5) कु.प्रगती मोरे वर्ग 7वा (परीपाठ मंत्री) 6) कु.पल्लवी दाते वर्ग 7वा (क्रिडामंत्री) 7) कु.अक्षरा मोरे वर्ग 6वा (शा.पो.आहार मंत्री) 8) तन्मय चौधरी वर्ग 6वा (स्वच्छता व आरोग्यमंत्री) 9) आर्यन तुमसरे वर्ग 5वा (पर्यावरण मंत्री) यांची निवड करण्यात आली. मुख्यमंत्र्यासमवेत सर्व मंत्र्यांना शाळेचे मुख्याध्यापक मा.बलकी सर यांनी शपथ दिली.
शपथविधी नंतर श्री.जांभुळे सर (स.शि.)यांनी प्रत्येकाची रजिस्टर वर स्वाक्षरी घेतली.त्यानंतर दर शनिवारला आयोजित होणाऱ्या स्पर्धांची जबाबदारी सर्व शिक्षकांनी स्विकारली.यात क्रिडास्पर्धा,वादविवाद,वक्तृत्व स्पर्धा,कागदकाम,सजावट,दैनिक परिपाठ इ.उपक्रमांचे स्पर्धा प्रमुख म्हणून जांभुळे सर राहतील.श्री.टापरे सर (स.शि.) हे कथाकथन,चित्रकला,एकपात्री अभिनय,मातीकाम,सांस्कृतिक स्पर्धा इ.उपक्रमांचे स्पर्धा प्रमुख म्हणून काम करतील.
श्री.वाघमारे सर(वि.शि.)यांनी संपूर्ण वर्षाचा 1 आॕगस्ट ते 31मार्च 2023 पर्यंतचा उपक्रमाचा आराखडा संगणकावर प्रिंट केला असून त्यावर आधारीत दर शनिवारला हे उपक्रम आयोजित केल्या जातील.पुस्तक परिचय,सामान्य ज्ञान,स्मरणशक्ती इ.स्पर्धांचे प्रमुख म्हणून श्री.वाघमारे सर काम करातील. सौ.मून मॕडम (स.शि.) या श्रृतलेखन,सुंदर हस्ताक्षर,उत्स्फूर्त लेखन,स्वच्छ मुलगा-मुलगी इ.उपक्रमाच्या स्पर्धा प्रमुख म्हणून काम करतील.
श्री.बलकी सर (मुख्याध्यापक) यांचेकडे शाळा परिसर स्वच्छता,वर्ग स्वच्छता इ.उपक्रमांचे स्पर्धा प्रमुख म्हणून काम करतील. अशाप्रकारे नियोजन करण्यात आले. आजपासून मंत्रिमंडळ स्वतंत्रपणे त्यांच्या अधिकारात येणाऱ्या फाईलवर काम करणार आहे.शिक्षकांची भुमिका फक्त सुलभकाची असणार आहे.अशाप्रकारे हा कार्यक्रम अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला.