सावली तालुका महिला काँग्रेस कमिटी तर्फे रक्षाबंधनाचा कार्यक्रम पोलीस स्टेशन,सावली येथे संपन्न.
सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक
सावली : दिनांक,३१ ऑगस्ट २०२३ रक्षाबंधन बहिण-भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस म्हणून साजरा केला जातो.या दिवशी बहीण आपल्या भावास राखी देऊन त्याच्या दिर्घआयुष्यासाठी प्रार्थना करते व भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो.या सणाला राखीपौर्णिमा, रक्षाबंधन म्हणून ओळखले जाते.बहीण या दिवशी भावाला ओवाळून त्याच्या हातावर राखी बांधते आणि आपले भावाविषयी प्रेम व्यक्त करते.
स्त्री सन्मान हा सुद्धा या सणामधून दिलेला उपदेश होय.अनेक दुष्कर्मी संकटापासून महिलांना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सुरक्षा प्रदान करणारे पोलीस बांधव व नगर प्रशासनाचा दुवा असणारे पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक,आशिष बोरकर वपोलीस स्टेशन चे कर्मचारी यांना आज सावली तालुका महिला काँग्रेसच्या वतीने राखी बांधून रक्षा बंधनाचा कार्यक्रम पोलीस स्टेशन,सावली घेण्यात आला.
यावेळी सावली तालुका काँग्रेस कमिटीच्या तालुका अध्यक्षा सौ.उषाताई भोयर,सावली नगर पंचायती च्या नगराध्यक्षा सौ.लताताई लाकडे,नगरसेविका सौ.सिमा संतोषवार,सौ.ज्योती गेडाम,सौ.पल्लवी ताटकोंडावार, सौ.अंजली देवगडे माजी ग्राम पंचायत सदस्या सौ.कविता मुत्यालवार ह्या वेळी उपस्थित होते.