सुरबोडी तंमुस अध्यक्षपदी लीलाधर ठाकरे
अमरदिप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,२६/०८/२३ ब्रम्हपुरी तालुक्यातील सुरबोडी येथील प्रतिष्ठित नागरिक लीलाधर ठाकरे यांची निवड सर्वांनुमते करण्यात आली.महाराष्ट्राचे तत्कालीन गृह मंत्री स्व.आर.आर.पाटील यांच्या संकल्पनेतून गाव तिथे तंटामुक्ती समिती स्थापन करण्यात यावी.गावातील तंटे गावातच मिटावे हा उदात्त हेतू ठेवून गाव स्तरावर तंटामुक्ती समितीची स्थापना करण्यात आली.
गावकऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या ग्रामसभेमध्ये तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी पुन्हा२०२३-२४ साठी पुन्हा एकदा लीलाधर ठाकरे यांची अविरोध निवड करण्यात आली.
लीलाधर ठाकरे हे तंटामुक्ती समिती निर्माण झाली तेव्हा पासून समितीचे सदस्य म्हणून दहा वर्ष राहिले.त्या नंतर सतत आठ वर्ष तंटामुक्ती समिती चे अध्यक्ष सुद्धा राहिले.त्या मुळे त्यांना समितीचा कारभार व अनुभव आहे म्हणूनच पुन्हा बिनविरोध निवड करण्यात आलीआहे.यावेळी ग्राम सचिवा सह गावातील प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी सरपंच राधिका श्याम बावनकुळे ,उप सरपंच दिगंबर कामडी,ग्रामस्थ सर्वश्री रामदास कानडी,श्याम बावनकुळे, राजु कामडी,सचिन कामडी,भूपेश कामडी,रामजी मेश्राम,या सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.