तिरूपती विद्यालय रेंगोळा/मांगली येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा.
नरेंद्र मेश्राम -जिल्हा प्रतिनिधी, भंडारा
भंडारा : तिरूपती विद्यालय तथा स्व.निर्धनराव पाटिल वाघाये कनिष्ठ कला महा.रेंगोळा /मांगली येथे माजी तंटा मुक्ती अध्यक्ष भास्कर काटगाये यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले यावेळी प्राचार्य विलासभाऊ वाघाये ,सरपंच पोर्णिमाताई फुलेकर,उपसरपंच दिपक ठवकर, मुख्याध्यापक पी. जी.ठवकर,ग्रामपंचायत पदाधिकारी,ग्रामनिवासी जनता,पालक,शालेय विद्यार्थी उपस्थित होते .यावेळी जि.प.शाळा व तिरूपती विद्यालय यांच्या संयुक्त विदयमाने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य विलासभाऊ वाघाये,प्रमूख पाहुणे सरपंच पोर्णिमाताई फुलेकर,उपसरपंच प्रविण ठवकर,भास्कर काटगाये ,शालूताई पूरामकर,सचिन वनवे ,सूभाष वनवे, गोसू मेश्राम ,अशोक वाढई,उषाताई कठाणे मॅडम ,गोपाल धनगर,पोलीस पाटिल पेमेश फुलेकर उपस्थित होते.
यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी देभभक्तिपर गीत,भाषण सादर करून उपस्थिताची मने जिंकली.प्रमूख पाहुण्यांनी स्वातंत्र्यदिनाचे महत्व पटवून दिले यावेळी शाळेचा माजी विद्यार्थी" भूताचे झाड" चित्रपटनिर्माता करण लूटे यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे संचालन जि.पी.धनगर,यांनी तर प्रास्ताविक डी.डी.फटे व आभार पी.जी.ठवकर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी शालेय विद्यार्थी, अंगण वाडी सेविका यांनी अथक परिश्रम घेतले.