विकास ग्रुपच्या साथीने खेमजईमध्ये सावित्रीबाई फुले अभ्यासिका सुरू.
एस.के.24 तास
चिमुर : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुस्तकाच्या वाचनातून ज्ञानामृत मिळावे आणि हेच गावठी मुलं जगाच्या स्पर्धेत उतरावे या उद्देशाने खेमजई येथील ग्रामविकास समितीच्या पुढाकारातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिकेची मुहूर्त वेळ रोवण्यात आली. या परिवर्तनशील कार्याला "विकास ग्रुप" यांचे भक्कम पाठबळ मिळत असून जिल्हा परिषद शाळा व ग्रामपंचायत खेमजई यांचे फार मोठे सहकार्य लाभत आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे स्वतःचा शैक्षणिक, बौद्धिक,सामाजिक, आर्थिक विकास करण्यासाठी शिक्षण आणि वाचन याव्यतिरिक्त दुसरे भांडवल उपलब्ध नसते. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात आपल्या देशातील ग्रामीण भाग मागे पडण्याची शक्यता निर्माण झाली असताना खेमजई गावच्या ग्रामविकास समितीच्या युवकांच्या डोक्यात अभ्यासिका सुरू करण्याची कल्पना आली. त्यानंतर त्यांनी गावातील जिल्हा परिषद शाळा आणि ग्रामपंचायतच्या सहकार्याने अभ्यासिकेची जागा निश्चित केली. नंतर त्या जागेची स्वच्छता रंगरंगोटी वीज व्यवस्था करण्यासाठी युवकांनीच पुढाकार घेतला. या कामाची माहिती व्हाट्सअपच्या माध्यमातून खेमजई गावचे सुपुत्र व विकास ग्रुपचे सदस्य संदीप भेले यांना झाली आणि त्यांनी अभ्यासिकेच्या टेबल खुर्ची पुस्तकासाठी 10 हजार रुपयाची मदत दिली.
विकास ग्रुपचे काम शेगाव परिसरातील शेगाव बु. शेगाव खुर्द व खेमजई गावात सुरू आहे. यामध्ये शाळेत पंख्यांची व्यवस्था करणे, गावातील लोकांना रोजगार मिळावा यासाठी रोपवाटिकेला मदत करणे व ज्या कामासाठी शासकीय निधी येत नाही. अशा सामाजिक कामांना मदत करणे या उद्देशाने विकास ग्रुप काम करतो. दिनांक 19 ऑगस्ट 2023 रोजी विकास ग्रुपचे निर्माते किशोर पेटकर आणि इतर सदस्यांनी या अभ्यासिकेला भेट दिली. गावातील युवकांशी संवाद साधत अभ्यासिकेला सर्वतोपरी मदत विकास ग्रुप चे माध्यमातून करण्याची ग्वाही दिली.
ही अभ्यासिका सुरू करण्यासाठी ग्रामविकास समितीचे कार्यकर्ते विलास चौधरी,रोशन हजारे, संतोष श्रीरामे,ईश्वर हजारे,अमोल श्रीरामे,प्रशांत हजारे,अनंता चौधरी,आनंद गायकवाड,साईनाथ दडमल,राजेश दडमल,प्रज्वल गायकवाड,नितेश गजबे, हस्तीक चौधरी,चेतन खारकर,योगेश चौधरी, सचिन घरत,रोहित जांभुळे,मनोहर गजबे, ईश्वर दडमल, राजू चौधरी, रुपेश दडमल,आदित्य पद्माईकर,निलेश बावणे,सूरज रंदद्ये,शुभम खारकर, शकर गडमडे,सूरज कापटे,लंकेश भेले,स्वप्नील घरत, वैष्णव पोईनकर अशी अनेक युवक परिश्रम घेत आहे.