अमृत भारत स्टेशन स्कीम अंतर्गत वडसा (देसाईगंज), या रेल्वे स्टेशन चा पुर्णविकासाचा उद्घाटन मान.खासदार अशोकजी नेते यांच्या हस्ते करण्यात आले.

अमृत भारत स्टेशन स्कीम अंतर्गत वडसा (देसाईगंज), या रेल्वे स्टेशन चा पुर्णविकासाचा उद्घाटन मान.खासदार अशोकजी नेते यांच्या हस्ते करण्यात आले.


एस.के.24 तास


वडसा : सतत नेहमी सातत्याने रेल्वे संबंधित पाठपुराव्यामुळे   खासदार अशोकजी ‌नेते यांच्या प्रयत्नाला यश येऊन आज दि.०६ ऑगस्ट २०२३ रोजी देशाचे लाडके लोकप्रिय पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी जी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉम्प्रेसिंग च्या माध्यमातून अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत ५०८ रेल्वे स्टेशन चा समावेश आहे.यामध्ये महाराष्ट्रात स्टेशन ४४ असुन या अमृत भारत रेल्वे स्टेशनचा पुनर्विकासाचा शिलान्यास कार्यक्रम संपन्न झाला.

यापैकी खासदार अशोकजी नेते यांच्या प्रयत्नाने गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातील वडसा (देसाईगंज),आमगांव येथे अमृत भारत स्टेशन समाविष्ट करण्यात आहे.जिल्हातील एकमेव रेल्वे स्टेशन वडसा(देसाईगंज) आहे.या स्टेशनवरून नागरिकांची रहदारी मोठया प्रमाणात होते.


अमृत भारत स्टेशन अंतर्गत  वडसा (देसाईगंज ) या रेल्वे स्टेशन चा उद्घाटन प्रसंगी खासदार अशोक नेते यांनी  बोलतांना मी रेल्वे संबंधित नेहमी सतत सातत्याने अनेक रखडलेले प्रश्न मार्गी लावलेले  आहेत. त्या बरोबर च नव्या बजेट नुसार अमृत भारत स्टेशन स्कीम मध्ये वडसा (देसाईगंज)या रेल्वे स्थानकांचा आज पंतप्रधान मान.नरेंद्र मोदी जी यांच्या द्वारे आभासी पद्धतीने पुनर्विकास चा शिलान्यास संपन्न झाला.अमृत भारत कार्यक्रमासाठी आदरणीय पंतप्रधानांनी गेल्या ९ वर्षात सातत्याने प्रशंसनीय आणि ऐतिहासिक विकास कामे केली.


अमृत ​​भारत स्थानक योजनेद्वारे रेल्वे विकासाचा मास्टर प्लॅन तयार करणे आणि स्टेशन पोहोचणे,वेटिंग, हॉल,मोफत वाय-फाय, यासारख्या नागरिकांच्या आधुनिक सोयी सुविधा सुद्धा उपलब्ध होणार आहेत.वडसा स्टेशनचा पुनर्विकास खर्च: १८.४ कोटी आहे.असे प्रतिपादन खासदार अशोकजी ‌नेते यांनी उद्घाटन प्रसंगी केले.


यावेळी प्रामुख्याने खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते, आमदार कृष्णाजी गजबे, जिल्हाध्यक्ष प्रशांत जी वाघरे, जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे,जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा,माजी जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे,जिल्हा संघटन महामंत्री संजय गजपुरे,जिल्हा उपाध्यक्ष मोतीभाई कुकरेजा, उपप्रबंधक अशोक सुर्यवंशी साहेब,युवा मोर्चा चे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये,माजी नगराध्यक्षा,शालुताई दडवंते,


पद्मभूषण पुरस्कृत डॉ.परशुराम खुणे, अल्पसंख्याक आघाडी चे जिल्हाध्यक्ष बबलुभाई हुसैनी,जिल्हा संपर्क प्रमुख सदानंद कुथे,ओबिसी प्रदेश सरचिटणीस संगीता रेवतकर,युवती प्रमुख प्रिती शंभरकर, ता.अध्यक्ष नंदु नाकतोडे,ता.अध्यक्ष अनिल शेंडे,युवा ता.अध्यक्ष पंकज खरवडे,ॲड.उमेश वालदे,उल्हास देशमुख,रवि गोटेफोडे जी,साकेत भानारकर, विनोद देओजवार, अनिल कुनघाडकर, अनिल पोहनकर, केशव निंबोंड,वसंता दोनाडकर,प्रमोद झिलपे,ओमकार मडावी तसेच हजारोंच्या मोठया संख्येने नागरिक व विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !