पोहायला गेला अन् पाण्यात बुडून मृत्यू झाला.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक.
ब्रम्हपुरी : दिनांक,१६/०८/२३ अधिक मासाच्या समाप्ती चा शेवटचा दिवस म्हणून काही धार्मिक लोक नदीवरती गंगा स्नान करून धार्मिक भावना आणि पावित्र्य जपण्याचे कार्य करतात.ब्रह्मपुरी तालुक्यातील चिखलगाव येथील रहिवाशी हल्ली मुक्काम कुर्झा निवासी गोपाल अरुण नाकतोडे वय 22 वर्षे हा कुर्झा येथे आपल्या बहिणीकडे बऱ्याच दिवसापासून राहत होता.तो ब्रह्मपुरी येथील सालवन कंपनीमध्ये दोन-तीन वर्षापासून ट्रक चालक म्हणून काम करीत होता.
आज अधिक महिन्याचा शेवटचा दिवस होता म्हणून धार्मिक भावना जोपासण्याच्या आणि त्याचे पावित्र्य अबाधित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून अधिक मासाच्या शेवटच्या दिवशी गंगा स्नान (आंघोळ) करण्यासाठी कुर्झा येथे राहणाऱा भाटवा यशवंत अशोक ठेंगरी व इतर मित्रासह सकाळी ठीक ७-००ते ७-३०वाजता दरम्यान मौजा भालेश्वर येथील देवस्थान वैनगंगेच्या घाटावर आंघोळ करण्यासाठी आला.
हसत खेळत आंघोळ करता करता तो खोल पाण्यात गेला.त्याला त्या ठिकाणी असलेल्या खोल पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो पाण्याबाहेर परत आलाच नाही.तो तिथेच बुडून मरण पावला.
भालेश्वर घाटावर एक व्यक्ती बुडून मरण पावला अशी बातमी वाऱ्यासारखी पसरताच नातेवाईक, मित्रमंडळी ,गावकरी यांनी भालेश्वर घाटावरील वैनगंगा नदीवर धाव घेतली. बघ्यांची एकच गर्दी उसळली.ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनला याची माहिती मिळताच अ-हेरनवरगाव बीटाचे जमादार अरुण पिसे, पोलीस शिपाई पुरुषोत्तम माधव भरडे व अन्य सहकारी घटनास्थळी दाखल झाले.
गोपाल अरुण नाकतोडे ज्या ठिकाणी बुडून मरण पावला त्या ठिकाणापासून तर आजूबाजूचा परिसर जमादार अरुण पिसे यांनी आपल्या देखरेखीखाली मृतदेह भालेश्वर येथील नागरिकांच्या मदतीने शोधण्याचा प्रयत्न केला परंतु बातमी लिहीपर्यंत मृतदेहाचा शोध लागलेला नाही.त्यांनी चंद्रपूर येथील एनडीआरएफ टीमला मृतदेहाचा शोध घेण्यासाठी पाचारण केले आहे.
घटनास्थळी ब्रह्मपुरी तहसील विभागातील महसूल विभागाचे कर्मचारी अ-हेरनवरगाव साजा चे तलाठी श्री दानवे साहेब ,पोलीस विभाग कर्मचारी ,अ-हेर नवरगाव चे पोलीस पाटील, मृतक गोपाल नाकतोडे चे नातेवाईक घटनास्थळी तळ ठोकून बसलेले आहेत.