बेजवाबदार उपजिल्हा रुग्णालय मुल येथील कर्तव्य असणारे डॉक्टर व कर्मचारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. ★ जिल्ह्याचे पालकमंत्री या प्रकरणाकडे लक्ष घालणार का ? ★ प्रेस क्लब मूल पत्र परिषदेत वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष डेव्हिड खोब्रागडे यांचा आरोप.



बेजवाबदार उपजिल्हा रुग्णालय मुल येथील कर्तव्य असणारे डॉक्टर व कर्मचारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा  गुन्हा दाखल करा.


★ जिल्ह्याचे पालकमंत्री या प्रकरणाकडे लक्ष घालणार का ?


प्रेस क्लब मूल पत्र परिषदेत वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष डेव्हिड खोब्रागडे यांचा आरोप.


नितेश मँकलवार - उपसंपादक


मुल : मुल शहरातील कायमस्वरूपी वास्तव्यात राहत असलेले मोल मजुरी करून कुटुंबाचा सुखाने संसार चालवीत  अचानक दिनांक 10-8-2023 रोजी सुमित सुभाष गेडाम यांची प्रकृती अचानक बरी नसल्याने त्याला उपजिल्हा रुग्णालय मुल येथे भरती करण्यात आले. परंतु दिनांक 11-8-2023 रोजी अंदाजे दुपारी,12:00 वा.च्या दरम्यान सुमित यांची प्रकृती अचानक अत्यंत चिंताजनक झाली.


त्यावेळी रुग्णांची आई द्वारका सुभाष गेडाम यांनी कर्तव्यावर असणाऱ्या परिचारिका यांना स्वतःच जाऊन माझ्या मुलाची प्रकृती चिंताजनक झालेली आहे व तुम्ही तात्काळ येऊन माझ्या मुलांवर उपचार करावे अशी विनंती केली असता व संबंधित असणाऱ्या डॉक्टरला तात्काळ बोलावणे करावे अशी विनंती केली असता संबंधित परिचारिका यांनी उद्धट भाषेचा वापर करून मला एवढेच काम आहे का तुम्हाला गरज आहे.


 तुम्हीच डॉक्टरांना बोलावणे करा. असे अपमानित बोलून रुग्णांच्या आईला हाकलून दिले त्यानंतर रुग्णालय येथे भरती असणारे रुग्ण आकाश येसणकर यांनी माझी आपबीती बघून त्यांनी मला कर्तव्यावर असणारे डॉक्टर यांच्याकडे घेऊन गेले असता संबंधित डॉक्टरांनी मला सिरीयस पेशंट तपासायचे आहे मला आता वेळ नाही मी थोड्या वेळाने येतो असे  म्हणून मला तिथून हाकलून दिले.


 माझे जावई नामे श्री.डेविड खोब्रागडे दवाखान्यात आले त्यांनी सुद्धा संबंधित डॉक्टरांकडे चारदा रुग्णालयात भरती असणारे रुग्ण सुमित गेडाम यांच्यावर उपचार करावे ही विनंती केली असता त्यांच्या सुद्धा विनंतीचा कुठलाही मान न होता माझ्या मुलांवर उपचार केले नाही. तब्बल तीन ते चार तासांनी संबंधित कर्तव्यावर असणारे परिचारक यांनी रुग्णालयात कुठल्याही प्रकारचा उपचार न करता आम्हाला जिल्हा सामान्य रुग्णालय येथे तात्काळ घेऊन जावे म्हणून रेफर केले.


 चंद्रपूर येथे रुग्णवाहिकेत जात असतानाच वाटेतच प्राणज्योत मालावल्याने चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या डॉक्टरानीं रुग्ण सुमित गेडाम यांना घोषित करण्यात आले.


उपजिल्हा रुग्णालय मुल यांच्या अशा अलगर्जी व बेजबाबदारपणाच्या वागणुकीमुळे सुभाष गेडाम यांचा जीव जाणून बुजून घेण्यात आला असा आरोप म्हणून प्रेस क्लब मुल येथे पत्र परिषदेत आयोजित येथे बोलताना वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष,डेव्हिड खोब्रागडे  यांनी आरोप करण्यात आले.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !