घोडाझरी इको सेन्सिटिव्ह झोन विरोधात नागरिक संतप्त. ★ वनविभागाने चुकीची माहिती देऊन घेतले ठराव.



घोडाझरी इको सेन्सिटिव्ह झोन विरोधात नागरिक संतप्त.


★ वनविभागाने चुकीची माहिती देऊन घेतले ठराव.


एस.के.24 तास


चिमुर : वनविभागाने शंकरपूर वनपरिक्षेत्रातील 12 गावांना घोडाझरी इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये समाविष्ट करण्यासाठी ग्रामपंचायतींना ठराव घेण्यासंदर्भात जुलै महिन्यात पत्र दिले होते. या विरोधात नागरिक संतप्त असून ग्रामपंचायतने ग्रामसभेच्या परवानगीशिवाय वन विभागाला कोणताही ठराव देऊ नये अशी भूमिका घेताना दिसून येत आहे.


शंकरपूर उपवनपरिक्षेत्रातील 6 ग्रामपंचायती यामध्ये  कवडशी देशमाने, डोमा, खैरी, नवतळा, चकजटेपार यांचा समावेश असून एकूण 12 गावांचा  समाविष्ट केली आहेत. या 12 गावांमध्ये डोंगरगाव, डोमा, चकजटेपार, कवडशी, दहेगाव,झरी, नवतळा, विरव्हा या गावांचा समावेश आहे. ग्रामसभेला विश्वासात न घेता गावातील लोकांना अंधारात ठेवून ग्रामपंचायतचे ग्रामसेवक आणि सरपंच यांना चुकीची माहिती देऊन वनविभागाकडून परस्पर ठराव घेण्यात येत आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तर काही सरपंचांना ठराव न दिल्यास तुमच्या गावातील लोकांना शासकीय योजनेचा लाभ मिळणार नाही, अशी चुकीची माहिती देऊन मासिक सभेचे ठराव मिळवले.


या प्रकारामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी येत्या 15 ऑगस्ट च्या ग्रामसभेला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून सर्व गावातील लोकांनाा इको सेन्सिटिव्ह झोन म्हणजे नेमके काय? त्याचा गावकऱ्यांना व पर्यावरणाला नेमका काय फायदा होईल? यासंदर्भात सविस्तर माहिती देण्याची मागणी गावातील नागरिकांनी केली आहे. तसेच बेकायदेशीरपणे ग्रामपंचायतच्या मासिक सभेचे ठराव देणाऱ्या ग्रामसेवक व पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !