ब्रह्मपुरी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, फवारा चौक व मुख्य मार्गाचे सौंदर्यीकरण करा. ★ मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा युवा मोर्चाचा इशारा.



ब्रह्मपुरी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक,फवारा चौक व मुख्य मार्गाचे सौंदर्यीकरण करा.


मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा युवा मोर्चाचा इशारा.


अमरदीप लोखंडे, सहसंपादक.


ब्रह्मपुरी  : दिनांक,२८/०८/२०२३ ब्रह्मपुरी शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक ते फवारा चौक ते सावरकर चौक हा शहरातील मुख्य मार्ग आहे. शहरातील जवळपास पूर्ण बाजारपेठ या मार्गावर आहे. परंतु या मार्गाला शोभेल असे सौंदर्य करण इथे झालेले नाही. यासंदर्भात भारतीय जनता युवा मोर्चा ब्रह्मपुरी च्या वतीने शहरातील मुख्य असलेला छत्रपती शिवाजी महाराज चौक, फवारा चौक व मुख्य मार्गाचे सौंदर्यीकरण करण्याची मागणी ब्रह्मपुरी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली. मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी भाजयुमोच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिला.


महाराष्ट्र सरकारच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नगर परिषदेला शहरातील चौकांच्या सौंदर्य करण्यासाठी दीड कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. परंतु अद्याप याबाबत कोणत्याही प्रकारचे सौंदर्यीकरण नगरपरिषद ब्रह्मपुरी च्या वतीने करण्यात आलेले नाही. या निधीचा लवकरात लवकर उपयोग करून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील सौंदर्यीकरण, फवारा चौक येथील फवारा कायमस्वरूपी सुरू करणे व छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वातंत्र्यवीर सावरकर चौकापर्यंत जाणारे दुभाजक व्यवस्थित करण्याबाबत या निवेदनात म्हंटले आहे. याप्रसंगी शिष्टमंडळाशी चर्चा करताना नगर परिषदेच्या मुख्याधिकारी आर्शिया जुही यांनी लवकरात लवकर या ठिकाणाचे सौंदर्यीकरण करू असे आश्वासन दिले.


याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष अरविंद नंदुरकर, नगरसेवक मनोज वठे, भाजयुमो शहर अध्यक्ष प्रा. सुयोग बाळबुधे, भाजयुमो जिल्हा सचिव तनय देशकर,शहर महामंत्री स्वप्निल अलगदिवे, पंकज माकोडे, शहर सचिव दत्ता येरावार,उपाध्यक्ष पवन जयस्वाल,अमित रोकडे,रजत थोटे, ललित उरकुडे, किशोर बावनकुळे यांच्यासह युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !