येरगांव येथे ध्वजारोहना निमित्त "एक दिवा शहीद विरांसाठी" या कार्यक्रमाचे आयोजन.
एस.के.24 तास
मुल : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या पटांगणात ग्राम पंचायत कार्यालय व जि.प. शाळा येरगांव यांचे वतीने करण्यात आले. या कार्यक्रमाचे मान शाळेचे ध्वजारोहन मुख्याध्यापक श्री. वाढई सर तर ग्राप पंचायत कार्यालयं व गावातील गांधी चौक येथील ध्वजारोहन मान सौ. प्रतिभाताई जुमनाके सरपंच ग्रा.पं.यांचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.
या वेळी राष्ट्रगीत,झेंडा गीत,महाराष्ट्र गीत व प्रतिज्ञा म्हणत, भारत स्काउड गाईड च्या पथकांनी परेड च्या वतीने भारतीय तिरंग्याला व उपस्थित पाहुण्यांना शाल्युट मारुन सलामी देत आजच्या दिवसाच मान देण्यात आले. व ग्राम पंचायत कार्यालयं येथे ९ ऑगस्ट क्रांती दिनाचं प्रतीक फलकाला पुष्प अर्पण करून ७५ व्या अमृत महोत्सव साजरा करीत हुतात्म्यांच्या आठवणी ना उजाळा देण्यासाठी एक दिवा शहीद विरांसाठी हा कार्यक्रम आयोजित करून शाळेच्या पटांगणात वृक्षारोपण करण्यात आले.
या कार्यक्रमाला उपस्थित शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. शरद ह. नागापुरे, उपाध्यक्षा सौ.सोनीताई विनोद कुळमेथे सोबत सर्व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य,ग्राम पंचायत सदस्य. आरोग्य सेविका,अंगणवाडी सेविका. तथा इतर गावातील स्वयसेवी संघटना,युवक - युवती, पदाधिकारी,सर्व शिक्षकवृंद व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संचालन मान.श्री.कोकोटे सर यांनी केले.