श्रावण बाळ योजनेचा पगार पाच सहा महिने न मिळाल्यामुळे उपासमारीची पाळी.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक.
ब्रह्मपुरी : दिनांक,३१/०८/२३ शासनाने वयोवृद्ध स्त्री पुरुषांसाठी मासिक मानधन अर्थसाह्य देऊन त्यांचे कल्याण व विकासाकरिता विविध योजना सुरू केल्या आहेत.शासन निराधारांचा आर्थिक आसरा बनुन त्यांना दरमहा मानधन देऊन वयोवृद्धांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवून त्यांच्यात नव्या उमेदीने हसत खेळत जीवन जगण्याची ऊर्जा शक्ती देण्याचे बळ निर्माण करीत असते.
वयोवृद्ध निराधारांना मासिक मानधन मिळत असल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलून दिसते.परंतु कधीकधी शासनाच्या मनात काय येते ते त्यांनाच ठाऊक.. ब्रह्मपुरी तालुक्यातील अ-हेर नवरगाव येथील वयोवृद्ध स्त्री-पुरुषांना एप्रिल -२३ते ऑगस्ट महिन्या पर्यंत श्रावण बाळ योजनेचे मासिक मानधन अर्थसहाय्य अजूनही मिळालेले नाही.
त्यामुळे यांच्यापुढे पुढील जीवन कसे जगावे हा प्रश्न निर्माण झाला आहे. गावातील एका झाडाखाली ओट्यावर बसून सदर वयोवृद्ध हे आपापसात चर्चा करतांना मनोगत व्यक्त करीत होते की,आम्ही कोणते पाप केले की सरकारने आमच्यावरती अवकृपा केली आहे.. आम्ही पुढील जीवन कसे जगावे असा प्रश्नआमच्यापुढे निर्माण झाला आहे.
तरी शासनाने येणाऱ्या सणासुदीचा विचार करून आमचे थकीत असलेले पाच सहा महिन्याचे श्रावण बाळ योजनेचे मासिक अर्थसहाय्य मानधन देऊन येणारे सण आनंदात, हसत खेळत जगण्यास मदत करावीअसे कळकळीचे आवाहन श्रीमती राधाबाई शेंडे ,सुलोचना शेंडे,बन्सीजी क-हाडे ,महादेवराव कावळे, ऋषी चौधरी,माधव गुडी मेश्राम व इतर मानधन उचलणाऱ्या स्त्री-पुरुषांनी केले आहे.
श्रावणबाळ योजनेचे ५ महिन्यापासुन मानधन न मिळाल्यामुळे आमच्या कुटुंबावर मोठी उपासमार होत आहे.- श्री,महादेवराव कावळे.
श्रावण बाळ योजनेचे अजून पर्यंत पैसे न मिळाल्यामुळे भाजीपाला खर्च,औषधोपचार कसा करावा हा प्रश्न डोळ्यापुढे यमा सारखा आवासुन उभा आहे .- श्री,ऋषी चौधरी
जवळपास पाच सहा महिन्यापासून श्रावबाळ योजनेचे पैसे न मिळाल्यामुळे पै,पै ले माणूस महाग झालाआहे.त्यामुळे जीवन कसे जगावे या विचाराने रात्र, रात्रभर झोप लागत नाही.- श्री,बन्शि क-हाडे
सरकार आम्हाले पाच पाच सहा सहा महिने पगार दे नाही आम्ही कसा पोट भरावा. एकवेळचा आम्हाला सरकार नं आम्हाले मारून टाकलनं तं कामाचा - श्रीमती,राधाबाई शेंडे