क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासीका केंद्र,सालोरी कार्यकर्त्यांची मॅजिक उपक्रमाला भेट.
एस.के.24 तास
चिमुर : 15 आगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सुट्टीच्या निमित्याने युवा पिढी ही एकीकडे मौज मज्जा करण्यासाठी फिरण्यात वस्त दिसताना दुसरीकडे युवा पिढी समोर एक वेगळा आदर्श निर्माण करण्यासाठी सालोरी येथील युवानी गावात मिटींगचे आयोजन करून लोकांना विश्वासात घेऊन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिका केंद्राची निर्मिती करून पुढे अभ्यासिका चालवण्यासाठी येणाऱ्या अडचणी,अभ्यासाचे वेळापत्रक,नियमावली,अभ्यासिका संदर्भातली इतंबुत माहिती जाणून घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी 15 आगस्ट या दिवशी मॅजिक उपक्रमाला भेट देऊन संपूर्ण माहिती जाणून घेतली.
यावेळी अभ्यासिकेचे मार्गदर्शक कुलदीप श्रीरामे,अध्यक्ष - अतुल नन्नावरे, साचिव -दुर्गा मांडवकर ,रवीना शेंडे, प्रियंका वाढई,मंजुषा वाढई,राखी वाढई,सागर वाढई, जिवनदास ढोक,शुभम मोरे, अजय जीवतोडे कार्यकर्ते व सहकारी म्हणून साहस संयोजक - विलास चौधरी उपस्थित होते.
नवीनसंकल्प डोळ्यापुढे ठेवून नवाआदर्श समाजापुढे निर्माण करण्यासाठी कार्य करनाऱ्या कार्यकर्त्यांचे मॅजिक परिवार व विद्यार्थी संघटनेतर्फे मनपूर्वक अभिनंदन व धन्यवाद.