राज्य पत्रकार संघ जिल्हा सदस्यपदी,पत्रकार मनिष रक्षमवार.
नितेश मँकलवार - उपसंपादक
मुल : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ तालुका शाखा मूल ची विशेष बैठक नागपूर विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांच्या उपस्थितीत इको पार्क येथे संपन्न झाली. या सभेत जेष्ट पत्रकार व 'खबर महाराष्टाची ',चे संपादक मनीष रक्षमवर यांना सर्वानुमते जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून नामनिर्देशीत करण्यात आले आहे.
नागपूर विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांचे हस्ते यावेळी मनीष रक्षमावार यांचा गौरव करण्यात आला.जिल्हा कार्यकारिणीच्या निवडीनंतर संघटनेची वाटचाल व संघटनेचे उदिष्ट पार पाडणयाकरीता नियोजन करण्यासंबंधाने प्रा.महेश पानसे यांनी मार्गदर्शनानुसार आपण कार्य करणार असल्याचे मत रक्षमवार यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र,गोवा,गुजरात,कर्नाटक,दिल्ली या राज्यात विस्तारलेल्या राज्य पत्रकार संघात पूर्ण ताकदीने काम करणार असल्याचा निर्धार यावेळी नवनियुक्त जिल्हा कार्यकारिणी सदस्य मनीष रक्षामावर यांनी व्यक्त केला.मुल तालुक्यातील संघटनेचे सारे अधिकुत सदस्य यावेळी उपस्थित होते.