वाघ शिकार प्रकरण आरोपींना १४ ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी.
माहिती देण्यास अधिकाऱ्यांची टाळाटाळ.
सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक
गडचिरोली : तालुक्याच्या आंबेशिवणी येथील जंगलात दोन वाघांची शिकार प्रकरणात अटकेत असलेल्या बावरिया जमातीच्या ११ आरोपींना न्यायालयाने १२ ऑगस्ट पर्यंत वन कोठडी सुनावली होती.
बुधवारी पुन्हा त्या आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्व आरोपींना १४ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.
तालुक्याच्या आंबेशिवणी जंगल परिसरात आरोपींनी दोन वाघांची शिकार केली होती.सदर प्रकरणात दोन पेक्षा अधिक वाघांची शिकार झाल्याचा संशय आहे. त्यानुसार सहायक वनसंरक्षक,सोनल भडके यांच्या नेतृत्वात आरोपींची चौकशी सुरू होती.यासाठी आरोपींना २ ऑगस्ट पर्यंत वन कोठडी मागितली होती. वन कोठडी संपल्यानंतर ११ आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १४ ऑगस्ट पर्यंत वन कोठडी सुनावली.विशेष म्हणजे,दोन महिला आरोपी ९ ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडीत आहेत.
माहिती देण्यास अधिकाऱ्यांची टाळाटाळ : -
वाघ शिकार प्रकरणात वनविभागाच्या अधिकायांनी सुरुवातीपासूनच मोठी गोपनीयता बाळगली आहे. एकवेळा वाढीव कोठडी घेतली; पण तपासात ठोस काही हाती लागले नाही. त्यामुळे माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे.
या संदर्भात गडचिरोली वन मिलिश शर्मा यांना विचारले असता,सखोल चौकशी सुरु आहे. दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर अधिक माहिती देऊ, असे सांगितले.तपास अधिकारी व सहायक वनसंरक्षक सोनल भडके यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.