बावरिया टोळीचा होता सहभाग सावली तालुक्यातील वाघ शिकारीत.
सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक
गडचिरोली : तालुक्यातील आंबेशिवणी च्या जंगलात दोन वाघांची शिकार केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या सर्व १८ आरोपींना न्यायालयाने पुन्हा ६ सप्टेंबरपर्यंत चंद्रपूरच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
विशेष म्हणजे,बावरिया समाजाच्या या शिकारी टोळीतील एका आरोपीचा सावली तालुक्यातील वाघ शिकार प्रकरणात सहभाग होता.आंबेशिवणीच्या जंगलात बावरिया टोळीने दोन वाघांची शिकार केली. या प्रकरणी १३ आरोपींना सुरुवातीला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली.
टप्प्या टप्प्याने त्यांची चौकशी झाली.दरम्यान,आसाम राज्यातून पुन्हा पाच आरोपींना वन विभागाच्या पथकाने अटक केली होती. त्यामुळे एकूण आरोपींची संख्या १८ झाली.यात ७ महिला व ११ पुरुषांचा समावेश आहे.या सर्व आरोपींना २५ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. पुन्हा सर्व आरोपींना २५ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर केले असता ६ सप्टेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
शिकार व अवयव विक्रीचे जाळे किती राज्यात ?
बावरिया टोळीने गडचिरोली तालुक्यात दोन वाघांची शिकार केली.तर त्यापैकी एका आरोपी सदस्याचा सावली तालुक्यातील वाघांच्या शिकारीतही सहभाग होता.चंद्रपूर जिल्ह्यातही दोन वाघांची शिकार वेगवेगळ्या टोळीने केले.वाघांच्या अवयवाची विक्री वेगवेगळ्या राज्यात झाल्याने सदर प्रकरणाचे जाळे पुन्हा किती राज्यात पसरले आहे.हा सखोल चौकशीचा विषय आहे.