सार्वजनिक बांधकाम विभागाने गांगलवाडी_मूडझा या ग्रामीण मार्गावरील तात्काळ बुजविले खड्डे. ★ भारतीय जनता युवा मोर्चाच्या निवेदनाची दखल.


सार्वजनिक बांधकाम विभागाने  गांगलवाडी_मूडझा या ग्रामीण मार्गावरील तात्काळ बुजविले खड्डे.

 

★ भारतीय जनता युवा मोर्चाच्या निवेदनाची दखल.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक.


ब्रम्हपूरी : दिनांक,१६/०८/२३ भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी तालुकाध्यक्ष प्राचार्य,अरुण शेंडे यांचे नेतृत्वात ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे कर्तव्यतत्पर माजी आमदार प्रा. अतुलभाऊ देशकर यांचे मार्गदर्शनाखाली मान.उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग ब्रह्मपुरी ला दिनांक  ९ ऑगस्ट रोजी निवेदन देऊन गांगलवाडी- मुडझा या मार्गावरील असलेले मोठमोठे खड्डे तात्काळ बुजविण्यात यावे. याबाबत निवेदन दिले होते.


या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण खूपच वाढले होते. याची दखल घेऊन भाजपाने दिनांक 14 ऑगस्टपर्यंत हे खड्डे बुजविण्यात यावे अन्यथा १५ ऑगस्ट रोजी या खड्ड्यांमध्ये भाजयुमो तर्फे बेशरमाची झाडे लावून वृक्षारोपण करण्यात येईल. आणि 16 ऑगस्ट पासून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला होता.


मान.श्री.चहांदे उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग ब्रम्हपुरी यांनी देखील ठराविक कालावधीत खड्डे बुजवून भाजयुमोच्या कार्यकर्त्यांना मोठा दिलासा दिला.  त्यामुळे भाजयुमो पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त करून साहेबांचे आभार मानले.


निवेदनकर्त्यांमध्ये तालुकाध्यक्ष प्राचार्य अरुण शेंडे, प्रेमलाल धोटे तालुकाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा ब्रह्मपुरी तालुका, प्रा. रामलाल महादेव दोनाडकर तालुकाध्यक्ष भाजयुमो ब्रह्मपुरी तालुका, तनय देशकर जिल्हा सचिव भाजयुमो चंद्रपूर,ज्ञानेश्वर पाटील दिवटे महामंत्री भाजपा ब्रह्मपुरी, प्रा.यशवंत आंबोरकर महामंत्री भाजयुमो ब्रह्मपुरी तालुका, इंजिनियर अविनाश मस्के महामंत्री भाजयुमो  ब्रह्मपुरी तालुका, प्रकाश नन्नावरे जिल्हा उपाध्यक्ष भाजयुमो चंद्रपूर जिल्हा, लीलाराम राऊत जिल्हा सदस्य भाजयुमो चंद्रपूर,  भास्कर प्रधान चिचगांव इत्यादींनी निवेदन देऊन ही खड्डे बुजविण्याची मागणी केली होती.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !