विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या हस्ते मौजा.कापसी येथील मृतकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत.
एस.के.24 तास
सावली : दिनांक : २६ ऑगस्ट २०२३ ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा विरोधी पक्ष नेते मा. श्री. विजयभाऊ वडे्ट्टीवार यांच्या कडून युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष मा.किशोर कारडे यांच्या हस्ते मौजा.कापसी येथील मय्यत स्व.संदीप एकनाथ चापडे यांच्या कुटूंबियांना आर्थिक मदत देण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की मौजा.कापसी येथील मृतक युवक स्व.संदीप एकनाथ चापडे हे घरातील कुटुंब प्रमुख असून मिळेल ते काम करून कुटुंब चालवीत होते. त्यांचा घरातील परिस्थिती गरीब व ते भूमिहीन शेतमजूर होते. पण आकस्मिकपने त्यांचा मृत्य झाल्याने चापडे कुटुंबावर संकट कोसळले,त्यांच्या पाठीमागे बराच मोठा आप्त परिवार असून, कुटुंबाचा उदर्निवाहासाठी छोटा मोठा व्यवसाय करण्याकरिता मदत हवी असल्याची माहिती सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष,नितिन गोहणे यांना मिळाली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तालुकाध्यक्ष,नितिन गोहने यांनी तात्काळ विरोधी पक्षनेते माजी मंत्री,व विद्यमान आमदार लोकनेते श्री.विजयभाऊ वडेट्टिवार यांच्याशी संपर्क साधून आर्थिक मदत वरील चापडे कुटुंबीयास आर्थिक मदत मिळवून दिली.
त्यावेळी उपस्थित श्री.किशोर कारडे अध्यक्ष सावली तालुका युवक काँग्रेस व सरपंच ग्रामपंचायत कढोली, सौ. सुनिताताई दिवाकर काचीनवार सरपंच ग्रामपंचायत कापसी,सौ.शारदाताई संतोष कोहळे उपसरपंच ग्रामपंचायत कापसी,श्री. हिवराज खोब्रागडे सदस्य ग्रामपंचायत कापसी,श्री.दिवाकरभाऊ काचीनवार सामाजिक कार्यकर्ता कापसी,श्री.पत्रुजी परचाके मा. सरपंच कापसी सौ.नीलिमा भांडेकर,श्री.राजु भांडेकर, श्री.निलेश भांडेकर, श्री.आत्माराम परचाके,श्री.विक्की बारसागडे,श्री.जगदीश बांबोडे,श्री.निलेश भांडेकर,श्री. संतोषजी कोहळे,श्री.प्रमोद कन्नाके सदस्य ग्रामपंचायत कढोली आदी उपस्थित होते.