यश प्राप्ती एका रात्रीचा खेळ नाही कार्तिक तुपट यांनी केल्या आपल्या भावना व्यक्त.
एस.के.24 तास
ब्रह्मपुरी : दिनांक,२५/०८/२३ रक्तवीर सेना फाउंडेशन, ब्रह्मपुरी चे रक्तदाता पिंपळगाव (भोसले)निवासी रक्तवीर कार्तिक वामनराव तुपट यांची देशाचे रक्षण करण्यासाठी बीएसएफ सैन्य दलात नुकतीच निवड झालेली आहे.
समाजातील गरजू लोकांना रक्तदानासारखे मोलाचे कार्य करीत असतांना त्यांची निवड संपूर्ण देशातील जनतेला आनंदी जीवन जगता यावे म्हणून बीएसएफ सैन्य दलात झालेली निवड ही पिंपळगांव वाशीयांना आनंदाची व अभिमानाची पर्वणी ठरली.
त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे रक्तवीर सेना फाउंडेशन, ब्रह्मपुरी चे सर्व पदाधिकारी तथा पिंपळगांववाशीय मित्र,गण- गोत्र परिवार यांनी त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव केला आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.
कोणतेही यश प्राप्त करण्यासाठी नियती किती वेळ घेईल याचा आपल्याला अंदाज बांधता येत नाही असे बीएसएफ जवान कार्तिक तुपट यांनी आपल्या मनोगतातून भावना व्यक्त केल्या.