काव्यातून उमटला सप्तरंगी श्रावण ; झाडीबोली साहित्य मंडळातर्फे काव्यमैफिल संपन्न.

काव्यातून उमटला सप्तरंगी श्रावण ; झाडीबोली साहित्य मंडळातर्फे काव्यमैफिल संपन्न.


एस.के.24 तास


बल्लारपूर : झाडीबोली साहित्य मंडळ शाखा बल्लारपूर च्या वतीने सप्तरंगी श्रावण या काव्यमैफिलीचे आभासी स्वरूपात करण्यात आले. उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर  तर  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी झाडीबोली साहित्य मंडळाचे जिल्हाध्यक्ष कवी,अरुण झगडकर होते.  गझलकार दिलीप पाटील राजुरा आणि रमेश बुरबुरे यवतमाळ यांची उपस्थिती होती.


झाडीबोलीतील कवी हा मातीशी, निसर्गाशी जुळलेला असून त्याच्या परिसराचा सुगंध त्याच्या कवितेतून दिसून येतो असे प्रतिपादन बंडोपंत बोढेकर यांनी केले.श्रावणाचे सर्व रंग आपल्या काव्यात ओतून त्याचे सप्तरंगी सादरीकरण करण्याकरीता अनेक प्रतिभावंत कवी,गजलकार यांनी काव्यमैफिलीत सहभाग घेतला.नवरसांनी काव्यातून मांडलेली रेलचेल,श्रावणी वातावरण व मोहक शब्दफेक यामुळे काव्यमैफिल अधिकाधिक  रंगत होत गेली. 


यामध्ये कवयित्री शीतल कर्णेवार,उपेंद्र रोहनकर, संजीव बोरकर,चंद्रकांत लेनगुरे,विजयकुमार मेश्राम गोंदिया, गजानन गेडाम, सुनील पोटे,डॉ.अर्चना पोटे,विरेन खोब्रागडे, राजुरा,सविता पिसे चिमूर, आनंदी चौधरी राजुरा,संगीता बांबोळे,मधुकर दुफारे,सुनील बावणे बल्लारपूर या सह अनेक प्रतिभावंत काव्यस्नेही मंडळींनी एकाहून एक सरस रचना सादर करीत काव्याचे सप्तरंगी इंद्रधनुष्य  तयार केले. 


या कार्यक्रमाचे  बहारदार सूत्रसंचालन कवी शाखाध्यक्ष प्रशांत भंडारे यांनी केले तर सुप्रसिद्ध गीतकार,सुनील बावणे यांनी आभार प्रदर्शन केले.या मैफलीत झाडीपट्टीच्या चारही जिल्ह्यांतील काव्यप्रेमींनी उपस्थिती लावली होती.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !