सुमित गेडाम या युवकाच्या मृत्यू प्रकरणी मान.पालकमंत्री नाम.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी दखल.
★ प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे दिले आदेश.
नितेश मँकलवार - उपसंपादक
मुल : उपजिल्हा रुग्णालयाच्या बेजबाबदार वागणुकीमुळे दोन दिवस आधी झालेल्या श्री.सुमित गेडाम या युवकाच्या मृत्यूप्रकरणी त्यांच्या नातेवाईकांनी केलेल्या मागणीची मान.पालकमंत्री नाम.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी सदर घटनेची गांभीर्यपूर्वक दखल घेऊन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्री.महादेव चिंचोले व रुग्ण कल्याण नियामक मंडळाचे पालकमंत्री प्रतिनिधी श्री. चंद्रकांत आष्टनकर यांना या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अश्या सुचना दिल्यात.
त्यानुसार आज दिनांक 13 ऑगस्ट 2023 ला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्री.चिंचोले साहेब यांनी उपजिल्हा रुग्णालय मूल येथे मान. पालकमंत्री यांचे स्विय सहाय्यक श्री. राईंचवार साहेब व पालकमंत्री प्रतिनिधी श्री.आष्टनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत घटनेविषयीची लेखी तक्रार घेऊन त्यावर रुग्णाच्या नातेवाईकांसोबत चर्चा करून घटनेची गांभीर्यपूर्वक सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे लेखी आश्वासन जिल्हा शल्य चिकित्सक यांचे कडून देण्यात आले.
यावेळी रुग्णाच्या नातेवाईक श्री.डेव्हिड खोब्रागडे ,सामाजीक कार्यकर्ते तथा संपादक श्री.मंगेश पोटवार , युवाक्रांती संघटनेचे अध्यक्ष श्री. प्रणित पाल उपाध्यक्ष निखिल वाढई,सह-सचिव श्री.आकाश येसनकर, निहाल गेडाम,सामाजीक कार्यकर्ते श्री.दिलीप गेडाम,धनराज चिमुलवार,सोनल आगबद्दनवार,सुधीर वाढगुरे,मनोहर दुर्गे इत्यादींची उपस्थिति होती.