चंद्रपूर मार्गाने छत्तीसगड ला मृतदेह घेऊन जाणाऱ्या वाहनाच्या अपघातात दुसऱ्याचा मृत्यु.


चंद्रपूर मार्गाने छत्तीसगड ला मृतदेह घेऊन जाणाऱ्या वाहनाच्या अपघातात दुसऱ्याचा मृत्यु.

राजेंद्र वाढई - उपसंपादक


मुलयेथुन छत्तीसगड राज्यात एका इसमाचा शवविच्छेदन केलेला मृतदेह नेणाऱ्या MH-34 BF 0050 क्रमांकाच्या स्कॉर्पिओ वाहनाचा मुल जवळील जानाळा गावालगत असलेल्या नाल्याच्या पुलाला धडकल्याने वाहनातील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सकाळी 10:30 वाजताच्या सुमारास घडली.

प्राप्त माहितीनुसार भरधाव वेगाने जाणाऱ्या स्कॉर्पिओ कार वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हे वाहन लहान रपट्याच्या पुलाला धडकले.ही धडक इतकी जोरदार होती की वाहनातील एका इसमाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एक इसम गंभीर जखमी झाला आहे.


अपघाताची माहिती कळताच मुल पोलीस घटनास्थळी पोहचले असुन त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने जखमी इसमाला वाहनातू बाहेर काढले व त्याला पुढील उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले आहे.


मृतदेह घेऊन जाणाऱ्या वाहनाच्या अपघातात दुसऱ्याचा मृत्यु  छत्तीसगड राज्यात नेण्यात येत होता.
Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !