मनोहर भिडे वर कारवाई करा ; चंद्रपुर अखिल भारतीय माळी महासंघाची मागणी.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
चंद्रपूर : अमरावती येथे दि.27/7/2023रोजी जय भारत मंगल कार्यालयात सभेत मनोहर भिडे यांनी राष्ट्रपिता तात्या साहेब महात्मा फुले ,महात्मा गांधी व अन्य महापुरूष यांचे बदल आक्षेपार्ह वक्तव्य करून राष्ट्रपिता ना अपमानीत केले समाजात सामाजिक तेढ निर्माण केला त्या मूळे जन सामान्यांच्या भावना दुखावल्या.
त्या निमित्ताने दि.3/8/2023 रोजी,चंद्रपुर अखिल भारतीय माळी महासंघाचे वतिने मनोहर भिडे यांचा निषेध करीत त्यांचेवर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाम .एकनाथ जी शिंदे यांचे कडे निवेदना द्वारे चंद्रपुर जिल्हाधिकारी मार्फतीने केली.
एक महिन्याचे आत कारवाई न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तिव्र आंदोलन करण्या चा ईशारा ही दिला.चंद्रपुर अखिल भारतीय माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष नानाजी पाटील आदे,नंदू बारस्कर,वसंतराव चहारे,राजू मोहूरले,कमलाकर गुरूनुले,रमेश कावळे,रमेश चौधरी इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.