नितेश मँकलवार - उपसंपादक
मुल : राज्य पत्रकार संघ तालुका शाखा मूल तर्पेâ एमआयडिसी परिसरात वेगवेगळ्या प्रकारच्या जातीचे वृक्षारोपन करून सामाजीक बांधिलकी तर जोपासली सोबत वृक्ष लागवडीचा व पर्यावरण संरक्षणाचा संदेश औद्योगिक क्षेत्राला दिला.
औद्योगिक विकास क्षेत्र मूल क्षेत्रात सामाजिक वनीकरण विभागाच्या मदतीने पेरू,आवळा,बेल,कडूलिंब अशा अनेक प्रजातिच्या वृक्षलागवडीचा उपक्रम ' पवनसुत इंडस्ट्री ' परिसरात राज्य पत्रकार संघातर्पेâ संपन्न झाला. याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून राज्य पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष प्रा. महेश पानसे, चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणी सदस्य मनिष रक्षमवार यावेळी कार्यक्रमाला उपस्थित होते.
मूल औद्योगिक विकास क्षेत्र परिसरात शासकीय नियमानुसार वुक्ष लागवड व्हावी, प्ऱदुषण कमी व्हावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम घेतला असे यावेळी राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष सतिश राजूरवार यांनी स्पष्ट केले.या सामाजिक उपक्रमास ' पवनसूत इंडस्ट्रीचे ' संचालक यांनी पुढाकार घेऊन सहकार्य केले.
यावेळी तालुका शाखेचे उपाध्यक्ष नितेश मॅकलवार,सरचिटणीस राजेंद्र वाढई, संघटक धमैश सूत्रपवार,सदस्य राजू सूत्रपवार,संतोष नावडे, उद्योजक नितीन चिलके उपस्थित होते.राज्य पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष प्रा.महेश पानसे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य,मनिष रक्षमवार यांनी तालुका संघाच्या उपक्रमाचे कौतुक केले.