निपुण भारत अंतर्गत द्वितीय शिक्षण परिषद तथा अध्ययन स्तर निश्चिती केंद्रस्तरीय कार्यशाळा जिबगाव येथे संपन्न.


निपुण भारत अंतर्गत द्वितीय शिक्षण परिषद तथा अध्ययन स्तर निश्चिती  केंद्रस्तरीय कार्यशाळा जिबगाव येथे संपन्न.


सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक


सावली : दिनांक,4 ऑगस्ट 2023 रोज शुक्रवार ला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जिबगाव येथे निपुण भारत अंतर्गत द्वितीय शिक्षण परिषद तथा अध्ययन स्तर निश्चिती  केंद्रस्तरीय कार्यशाळा घेण्यात आली होती.या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पित करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.


     या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून मा.राकेशभाऊ गोलेपल्लीवार सदस्य ग्रा.प.जिबगाव तथा संपादक जनसेवा न्यूज, मा.गणेशभाऊ चुदरी अध्यक्ष शा.व्य.स.,प्रमुख पाहुणे मा.कुंजनभाऊ गांगरेड्डीवार सदस्य शा. व्य. स. जिबगांव मा.राजेंद्र रक्षणवार सर केंद्रप्रमुख जिबगाव,मा.किशोरभाऊ येनगंटीवार उ.श्रे.मुख्या.जि.प.उ.प्रा.शाळा,हरंबा मा.मारोती निरे उ.श्रे.मुख्या.जि.प.उ.प्रा.शाळा, लोंढोली,मा.हितेंद्र कोकाटे उ.श्रे.मुख्या.जि.प.उ.प्रा.शाळा, उसेगाव,मा.सुरेश वायकोर उ.श्रे.मुख्या. जि.प.उ.प्रा.शाळा, जिबगाव तर प्रमुख मार्गदर्शक मा. सुनील चुनारकर सर जि प. उ.प्राथ.शाळा साखरी,मा.अविनाश घोनमोडे  सर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लोंढोली,मा. स्वप्नील डोईजड सर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा हरांबा उपस्थित होते.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक माननीय श्री राजेंद्र रक्षणवार सर केंद्रप्रमुख जिबगाव यांनी प्रास्ताविक संबोधनात अध्ययन स्तर निश्चिती कार्यशाळेबाबत माहिती दिली व विविध विषयातील झालेल्या बदलांची रूपरेषा सांगितली.मा.राकेशभाऊ गोलेपल्लीवार यांनी उदघाटनपर मार्गदर्शनात जि.प.शाळांमधील मुलांना आपले मुले समजून सर्वांगीण विकास साधावा असे आव्हाहन केले.


मा.गणेशभाऊ चुदरी यांनी अध्यक्षीयt मनोगतात शिक्षकच हे विद्यार्थ्यांच्या विकासाचे प्रेरक बनू शकतात.त्याकरिता शिक्षकांनी अधिक परिश्रम घेण्याचे आवाहन केले.मा.किशोर येनगंटीवार मुख्याध्यापक  हरंबा यांनी शिक्षण क्षेत्रात होत असलेल्या बदलांचा, नव्या शैक्षणिक धोरणांचा आपल्या संपूर्ण संबोधनात विस्तृतपणे माहिती दिली.


व अध्ययन स्तर निश्चित करून विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी शिक्षकांनी सजग असायला हवे अशा प्रकारचे सखोल असं मार्गदर्शन आपल्या संबोधनातून कथन केले.विषयनिहाय मार्गदर्शन मा.राजेंद्र रक्षणवार सर केंद्रप्रमुख यांनी निपुण भारत अभियान अंतर्गत इ.3 री पर्यंत 2026-27 पर्यंतपायाभूत साक्षरता व संख्याज्ञान विकसीत करण्याचे वर्गवार उद्दिष्ट याबाबत सखोल मार्गदर्शन केले.मा.स्वप्नील डोईजड सर यांनी विषय गणित यात अध्ययन स्तर चाचणी इयत्ता निहाय व क्षमतानिहाय कशी घ्यावी व चाचणीत वस्तुनिष्ठता कशाप्रकारे येईल व विद्यार्थ्यांची वैयक्तिक चाचणी व योग्य स्तर कसा पडताळता येईल.


 याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे असे सांगितले.मा. सुनिल चुनारकर सर यांनी विषय भाषा याविषयी अध्ययन स्तरात झालेल्या बदलांविषयी इयत्ता निहाय व क्षमतानिहाय अध्ययन स्तर चाचणी कशी घ्यावी याविषयी सखोल असं मार्गदर्शन केले मान. अविनाश घोनमोडे सर यांनी विषय इंग्रजी यात अध्ययन स्तर चाचणी इयत्तानिहाय व क्षमतानिहाय कशी घ्यावी. इंग्रजी या विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन व त्या चाचणीतील बारकावे याविषयी अतिशय सखोल असं मार्गदर्शन केले उल्लेखनीय बाब शिक्षक बंधू भगिनींचा कार्यशाळेतील अध्ययन स्तर,चाचणी,मार्गदर्शनात असलेला सक्रिय चर्चात्मक सहभाग व उपस्थिती उत्तम होती.


 जिबगाव शाळांनी केलेली उत्तम स्नेहभोजनाची सोय व उत्कृष्ट नियोजन कार्यक्रमाचे संचालन सौ.स्वाती कावळे मॅडम व कु.अंजु लिमजे मॅडम यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार दिपक कुळमेथे सर यांनी केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !