देश वाचवायचा असेल तर काँग्रेस पक्ष हाच मोठा पर्याय. - विरोधी पक्ष नेते,विजय वडेट्टीवार
★ ब्रह्मपुरी शहरात जल्लोषात विजय वडेट्टीवार यांचा नागरी सत्कार.
अमरदीप लोखंडे सहसंपादक
ब्रह्मपुरी :- १४/०८/२०२३ महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती फार बिकट आहे.या अगोदर दोन पायाची सरकार होती. मात्र इडी अन् सीबीआय च्या जाळयात अडकण्याच्या भीती पोटी 70 हजार करोडोचा घोटाळा दाबण्यासाठी या एका पर्यायावर, अटीवर राष्ट्रवादी सरकार मध्ये सामील झाली. व ट्रिपल इंजिनची सरकार महाराष्ट्रात बनली.केंद्रातील दोन राजकीय पुढारी सत्तेचा दूरुपयोग करून देशाला लुटत आहेत.. त्यामुळे 26 लाख लोकांचा रोजगार हिरावला गेला. महात्मा गांधी, राजीव गांधी, यांनी कमावलेल्या नवरत्नातुन स्वप्नातील भारत घडवून देशाची आर्थिक स्थिती सुधारली.
मात्र! आजचं सरकार केवळ विदेश वाऱ्या मध्ये भाषण बाजी करताना दिसतोय. इकडे मनिपुर सारख्या राज्याच्या बाबतीत मात्र प्रधानमंत्री यांना चिंता नसल्याचे कळते. आणि तिकडे मणिपूरचे मुख्यमंत्री मुस्लिमांच्या घरी मी मत मागायला सुद्धा जाणार नसल्याचे भाकीत करतो. म्हणून ओबीसींनो सावध! व्हा. आता जर तुम्हाला देश वाचवायचा असेल तर 2024 च्या निवडणुकीत केवळ काँग्रेस पक्ष सत्येत आणणे हाच मोठा योग्य पर्याय आहे. असे मौलीक विचार ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा विधिमंडळाचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले.
13 ऑगस्ट 2023 रोजी ब्रह्मपुरी शहरातील राजीव गांधी सभागृहात त्यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते सत्कारमूर्ती म्हणून बोलत होते.यावेळी मंचावर.आमदार अभिजीत वंजारी,आमदार सुधाकर अडबाले, माजी आमदार डॉ,नामदेवराव उसेंडी, नामदेव कीरसान, प्रा,जगनाडे सर, नगराध्यक्षा रीताताई ऊराडे, महाराष्ट्र युवक प्रदेश काँग्रेस सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमूरकर, तालुका युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस थाणेश्वर पाटील कायलकर, प्रा, राजेश कांबळे, नगरपरिषद काँग्रेसचे गट नेते विलास विखार, तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा मंगलाताई लोणबले, दीपक शुक्ला, महेश भर्रे, हितेंद्र राऊत,यांच्यासह अन्य नगरसेवक मंचावर उपस्थित होते.पुढे बोलतांना विजय वडेट्टीवार म्हणाले की केंद्रातील पुढारी जसे राज्यातील शिंदे -फडणवीस सरकारला आदेश देतील त्यांच्या म्हणण्या प्रमाणे ही सरकार चालते.
म्हणजेच बंद पिंजऱ्यातील पोपट जसा बोलतो ना! तशीच या सरकारची परिस्थिती आहे. आता तर सरकारने दोन रुपयाने वीजदर वाढवून 37% एवढा वीज भार वाढविला असून ग्राहकांची आर्थिक लूट चालवली आहे. एक कोटीचे रस्ते दोन कोटीच्या घरात केले जातात. टोलनाक्यांचि परिस्थिती तशीच दिसतेय.
यातून उर्वरित निम्मे पैसे भाजपच्या तिजोरी जात असल्याचा आरोप त्यांनी केला.ज्या विचारांनी माणसं जोडली जातात त्यांना फसव्यगिरीने मत मागून फसवले जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. एवढेच नव्हे तर भाजप 2024 मध्ये जर निवडून आली तर भविष्यात संविधानाला सुद्धा धोका तर निर्माण होईल की काय? अशी शंका सुद्धा विधिमंडळाची विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बोलतांना व्यक्त केली.