कामगार लोकांना राखी बांधून नेवजाबाई हितकारणी मुलांची शाळा मध्ये रक्षाबंधन सोहळा सोहळा पार पडला. ★ विद्यार्थ्यांनी बनविल्या मनमोहक राख्या.

कामगार लोकांना राखी बांधून नेवजाबाई हितकारणी मुलांची शाळा मध्ये रक्षाबंधन सोहळा सोहळा पार पडला.


★ विद्यार्थ्यांनी बनविल्या मनमोहक राख्या.


एस.के.24 तास


ब्रह्मपुरी : येथील नेवजाबाई हितकारणी मुलांची शाळा येथे रक्षाबंधन कार्यक्रम मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात पार पडला. दिनांक 26 ऑगस्ट रोजी राखी मेकिंग कॉम्पिटिशन द्वारे विद्यार्थ्यांच्या हाताने राख्या बनवण्यात आल्या व अतिशय मनमोहक अशा राख्या तयार झाल्या. आणि त्या तयार झालेल्या राख्या रक्षाबंधन च्या शुभमुहूर्तावरती शाळेतील विद्यार्थिनींनी एसटी बसचे ड्रायव्हर ,काम करणारे कामगार तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना व शिक्षकांना राख्या बांधून रक्षाबंधनाचा अनोखा कार्यक्रम  पार पडला. 


राखी बनविणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात आले व त्यांचा उत्साह द्विगुणीत करण्यात आला.कार्यक्रमाची विशेषता ही होती की अतिशय मनमोहक राख्या ह्या मुलांनी बनविलेल्या होत्या. आणि राखी बनविण्याचा विषय सुद्धा टाकाऊ पासून टिकाऊ तसेच भरड धान्याचा उपयोग करून राख्या तयार करणे असा असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला मोठ्या प्रमाणावर वाव मिळाला.


 व विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग दर्शविला अशा पद्धतीची कृती व सोहळा नियमित विद्यालयात व्हावा असा मानस  ने.ही. विद्यालयचे मुख्याध्यापक श्री रणदिवे सर ह्यांनी व्यक्त केला.तसेच विशेष सहकार्य मार्गदर्शन उपमुख्याध्यपक श्री नाईक सर,श्री नाकाडे सर पर्यवेक्षक ह्यांनी केले.कार्यक्रमाची अंमलबजावणी सर्व शिक्षक तथा शिक्षिका वृंद ह्यांनी केली. वरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री निलेश दोनाडकर सर व आभार तुळेश्वरी बालपांडे मॅडम यांनी केले. अशाप्रकारे अतिशय उत्साहात रक्षाबंधन सोहळा पार पडला.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !