इंदिरा गांधी नगरपरिषद शाळा इंदिरानगर,गडचिरोली स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.
सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक
गडचिरोली : इंदिरा गांधी नगरपरिषद शाळा इंदिरानगर,गडचिरोली स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,राजू मुरमुवार होते. यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.अध्यक्षीय भाषणात त्यांनी मार्गदर्शन केले.
मिठावर कर लादून जनतेचे शोषण करणाऱ्या इंग्रजाप्रमाणेच स्वतंत्र भारतातही जर सरकारने विविध जुलमी कर लादून जनतेचे शोषण केले तर आपण स्वतंत्र झालो असे म्हणता येईल का,असा सवाल करीत मतदानाच्या प्रकियेत विद्यार्थ्यांनी मतदार म्हणून सहभाग नोंदवित अशा धोरणांचा विरोध करण्याची क्षमता मतदानाच्या माध्यमातून दाखवावी,असे प्रतिपादन,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,राजू मुरमुवार हे संबोधले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,राजू मुरमुरवार,उपाध्यक्ष,दिक्षा भांडेकर,सदस्य, संदिप येलफूलवार,रविंद्र, कोसरे,सौ,नेवारे मैडम,सौ,सोनी नैताम,सौ,बांबोळे मॅडम,माजी उपाध्यक्ष न.प. गडचिरोली श्री,अनिल कुणघाडकर व शाळेचे मुख्याध्यापक - श्री,उईके सर सौ,कैपिलवार, मॅडम, सौ,शमने मॅडम,श्री, राकेश सर,श्री,पर्वते सर पालक,गावातील नागरिक, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.