प्रसिद्ध ' पवनसुत इंडस्ट्री ' ला विदयार्थ्यांची औदयोगिक भेट.

प्रसिद्ध ' पवनसुत इंडस्ट्री ' ला विदयार्थ्यांची औदयोगिक भेट.


राजेंद्र वाढई - उपसंपादक


मुल : तालुक्यातील एम.आय.डि.सी.मधील प्रसिद्ध ' पवनसूत ब्रिक वर्क्स ' या उद्योगाला  नवभारत क.महा.मूल येथील construction  Technology  या शाखेच्या विदयार्थ्यांनी औद्योगीक भेट दिली.


         

संपूर्ण तालुक्यात दर्जेदार फायर ब्रिक.पुरवठ्या करिता पवनसुत ब्रिक उद्योग  प्रसिद्ध आहे.या औदयोगिक  भेटीत विटांकरीता वापरण्यात येणारे मटेरियल,प्रमाण,मिक्सिंग प्रक्रिया,मोल्डिंग, या सारख्या  विटानिमींती करणाऱ्या लागणाऱ्या प्रक्रिया याची पुरेपूर माहिती उद्योगाचे संचालक,विवेक दुर्योधन यांनी दिली.


विदयार्थी व  विदयार्थीनी यांनी स्वता प्रात्यक्षिक करून विट निर्मितीचा अनुभव घेतला.या विटा उदयोगात मोठया प्रमाणात लागणारी  राख महाऔष्णिक विद्युत केंद़ चंद्रपूर येथून आणली जाते. यावेळी विभाग प्रमुख प्रा.महेश पानसे यांनी विद्यार्थ्यांना मागणी,पुरवठा,बाजारपेठ यावर  विद्यार्थ्यांना मोलाची माहिती दिली.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !