वाढोना येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या २२८ व्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.
सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक
नागभीड : दिनांक,13/08/2023 ला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 228 वी पुण्यतिथी कुरमार समाज वाढोना येथे साजरी करण्यात आली.महाराष्ट्रात कुशल प्रशासकांच्या यादीमध्ये अनेक कुशल राज्यकर्त्या स्त्रियांनीही नावे पाहायला मिळतात.
महाराष्ट्रातील पितृसत्ताक संस्कृतीला तडा देणारे एक नाव म्हणजे पुण्यश्लोक “अहिल्याबाई होळकर” आहे. अशा स्वराज्यनि स्त्रीयांमुळे महाराष्ट्राला कर्तृत्त्ववान स्त्रियांचा वारसा लाभला आहे.उत्तम शासक आणि योग्य न्याय करणारी राणी म्हणून त्यांची ओळख होती.राणी अहिल्यादेवी यांनी समाजाच्या हिताचे कार्य करून अनेक कुप्रथा बंद केल्या आणि समाजाला नवीन दिशा दिली.उत्तम राज्य केल्यानंतर वयाच्या 70 व्या वर्षी अहिल्याबाईंनी 13 ऑगस्ट 1795 रोजी जगाचा निरोप घेतला होता.
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 228 वी पुण्यतिथी आज कुरमार समाज वाढोना येथे साजरी करण्यात आली.
त्यावेळी उपस्थित मल्हार सेनेचे अध्यक्ष,एकनाथ जिगरवार,मल्हार सेना उपाध्यक्ष,आशिष परसवार,ग्राम पंचायत सदस्या,प्रियंका गंजेवार,तसेच कृष्णा गंजेवार,विजय काळेवार, सौ. लक्ष्मी देवेवार,शालू देवेवार,किशोर ओगुवार,सुरेश कंकलवार सर कैलास कंकलवार व इतर सर्व समाज बांधव उपस्थित होते.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 228 व्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.