महात्मा ज्योतिबा फुले अपमान करणाऱ्या संभाजी भिडे चा निषेध व्यक्त केला.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
मुल : महात्मा ज्योतिबा फुले अपमान करणाऱ्या करणाऱ्या संभाजी भिडे या नालायकाचा पुतळा जाळून क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले महिला मंडळ नगिनाबाग व महात्मा ज्योतिबा फुले आयोजन समिती तसेच माळी युवा मंच नगिनाबाग चंद्रपूर तसेच वार्डातील संपूर्ण नागरिक सर्वांनी मिळून जाहिर निषेध करून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
यावेळी झालेल्या निषेध कार्यक्रमांमध्ये डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांनी ज्या भिडे नावाच्या समाजकंटकावर भीमा कोरेगाव केस मध्ये आधीच गुन्हे दाखल झालेले आहेत त्याला शेकडो पोलिसांचे संरक्षण देऊन चंद्रपुरात कार्यक्रम घेणारे नेमके कोण भिडे हेच समर्थक बहुजन समाजाचे शत्रू आहेत आणि महात्मा फुले यांचे शत्रू आहेत असे प्रतिपादन केले.
बहुजन महापुरुषांचा अपमान करणे हा या देशातल्या मनुवादी आणि संघी किड्यांचा जुना छंद आहे . बहुजनांच्या महापुरुषांच्या नावाने आमच्याच बहुजन युवकांची मती भडकवून आमच्याच लोकांना एकमेकांच्या जाती विरोधात उभे करणे आणि त्यांच्यामध्ये दंगली घडवून आणण्याचा अशलाघ्य प्रयत्न केला जात आहे.
महाराष्ट्राचे सकल बहुजन समाजाचे दैवत असलेल्या बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने संघटना स्थापन करून बहुजन युवकांना छत्रपतींच्या खऱ्या विचारांच्याच विरोधातच तयार करण्याचे षडयंत्र मनोहर कुलकर्णी गेल्या तीस वर्षापासून करीत आहे. मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे बहुजन युवकांची माती भडकावून एका जातीला दुसऱ्या जातीविरुद्ध दंगल करण्यासाठी प्रवृत्त करतो.
छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे शत्रू कोण होते?डॉ बाबासाहेब आंबेडकर ,महात्मा ज्योतिराव फुले ,आणि शाहू महाराजांच्या समतावादी, न्यायवादी व्यवस्था प्रस्थपित करताना कुणी अडथळे निर्माण केले हे बहुजन समाजाला माहित होता कामा नये म्हणजेच आजच्या बहुजन समाजाला सुद्धा त्यांच्या खरा शत्रू समजायला नको म्हणून कधी मुसलमानाला कधी ख्रिश्चनाला तर कधी बौद्ध झाला शत्रू म्हणून उभे करून ही आपली राजकीय आणि धार्मिक पोळी भाजत आले आहेत.
आणि आज जेव्हा बहुजन समाजाला त्यांचे महापुरुष समजले आणि त्यांचा खरा शत्रू कळाला तेव्हा त्या महापुरुषांचा सतत अपमान करणे , चरित्र हनन करणे या कार्यक्रम सुरू केला. राष्ट्रमाता जिजाऊ वा छत्रपती शिवाजी महाराज असोत, ज्योतिराव फुले असोत, बाबासाहेब असोत शाहू महाराज असो यांची बदनामी करण्याचं एकसुत्री कार्यक्रम मनुवादी संघीं पिल्यामुळे मग तो कोशयारी असो वा पुरंदरे असो एकबोटे असो वा भीडे उर्फ मनोहर कुलकर्णी असो यांचा हा एक कलमी कार्यक्रम सुरू झाला आहे.
पेशवाईचा खात्मा करणारी भीमा कोरेगावच्या शौर्य दिवसाची आठवण म्हणून 200 वर्षी घेण्यात आलेल्या आयोजनात दोन समाजात तेढ निर्माण करण्यासाठी एकबोटे नी दंगली घडवून आणल्या आणि त्याला पाठीशी घालत इथल्या पेशवाई मनुवादी सरकारने त्याला शिक्षा न करता निर्दोष लोकांवरच कारवाईचे सूत्र चालू ठेवले
यावेळी सभेला डॉ सचिन भेदे डॉ राकेश गावतुरे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या छायाताई सोनुले संगीता पेटकुले रेखा लेनगुरे, सुरेखा निकोडे संगीता निकुरे रूपाबाई गुरनुले अजय महाडोळे रवी गुरनुले राजू मोहरले योगेश निकोडे प्रशांत ठाकरे दामू मोहरले सुरेश कावडे आणि नगीना बाग युवा मंचचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.