राष्ट्रीय महामार्ग व सर्विस रोडवरील अतिक्रमीत ईमारती हटविण्यासाठी व फुटपाथ करीता हॅकर्स झोनसाठी २९ ऑगस्टला वंचित करणार रास्तारोको आंदोलन.
★ वंचितचे जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे यांची प्रसिध्दी पत्रकातून माहिती.
एस.के.24 तास
गडचिरोली : गडचिरोली शहरातील प्रमुख चारही राष्ट्रीय महामार्गावरील व सर्विस रोडवरील अतिक्रमीत सर्व ईमारती हटविण्यासाठी व फुटपाथ धारकांकरीता हॅकर्स झोन निर्माण करण्यासाठी प्रशासनाला अल्टिमेटम देऊन प्रशासन कानाडोळा करीत असल्याने २९ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी अकरा वाजतापासून वंचित बहुजन आघाडीच्या वतिने रास्तारोको आंदोलन करणार असल्याची माहिती वंचितचे जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे यांनी प्रसिध्दी पत्रकातून दिली आहे.
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शहरात अरुंद रस्ता व सर्विस रोड अभावी अपघाताचे प्रमाण वाढले असून गेल्या एक दिड वर्षात घडलेल्या अपघातात निष्पाप सात लोकांचा बळी गेला त्याला केवळ फुटपाथ जबाबदार नसून महार्गाच्या रस्त्यावर व सर्विस रोडवर अतिक्रमण करून मोठमोठ्या ईमारती बांधून व्यवसाय थाटणारे सुद्धा तितकेच जबाबदार असल्याने अतिक्रमण हटाव मोहिम राबवून रस्त्यावरील सर्व ईमारती पाडून व सर्व रस्ते खुले करण्यात यावे यासाठी २७ जुलै रोजी जिल्हाधिकारी, राष्टीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता,नगर रचना अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व नगर परिषद मुख्याधिकारी या सर्व अधिका-यांना निवेदन देण्यात आले होते,
परंतु दुस-याच्या जीवाची पर्वा न करणारे मस्तावलेले अधिका-यांनी जन भावनेला व रास्त असलेल्या मागणीला केराची टोपली दाखविल्याने झोपेचा सोंग घेतलेल्या अधिका-यांना जागे करण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे, असेही टेंभुर्णे यांनी पत्रकात म्हटले आहे.
पुढे या पत्रकात म्हटले आहे की, राष्ट्रीय महामार्गाची रुंदी तिस मिटरची असतांना सुद्धा शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून त्याची रुंदी चोविस मिटर करण्यात आली आहे तरी परंतु चारही रोडवर चोविस मिटर ऐवजी ब-याच ठिकाणावर चोविसपेक्षा कमी रुंदीच्या रोडचे बांधकाम करण्यात आले आहे, शहर आराखड्यात चारही रोडच्या दोन्ही बाजूला बारा मिटरचे रस्ते आहेत ते सर्व रस्ते अतिक्रमणाने गायब झाले आहेत,बिल्डींग लाईनचे नियम पाळल्या गेले नसल्याने शहर विकासाचा बोझबारा वाजला आहे याला संबंधीत उदासीन अधिकारीच कारणीभूत आहेत असेही पत्रकात म्हटले आहे.