ग्राम वाचनालय ठरते अभ्यासू पोरांसाठी चिकाटी चे ध्येय.
अमरदिप लोखंडे - एस.के.24 तास
अ-हेरनवरगाव (ब्रह्मपुरी) : दिनांक,२७/०८/२३ प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांपासून ते कला, वाणिज्य, अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुसंस्काराचे, अभ्यासाचे वेड लागुन ध्येय, चिकाटी आणि जिज्ञासा वृत्ती निर्माण व्हावी देशाची सेवा करण्यासाठी नवतरुण निर्माण व्हावे यासाठी शासनाने खेड्यापाड्यात ग्राम वाचनालयाची सुरुवात केली.त्याचाच एक भाग म्हणून अ-हेर नवरगाव येथे ग्राम वाचनालयाची सुरुवात झाली.
या ग्राम वाचनालयाचा पुरेपूर जीवनात फायदा व्हावा या दृष्टिकोनातून विद्यार्थी शैक्षणिक व घरचे काम धंदे आटोपून एकाग्रपणे ग्राम वाचनालयात येऊन अभ्यास करीत असतात.अभ्यास करण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले की ,वाचनालय अभ्यासुवृत्तीच्या जीवनाला कलाटणी देणारे विद्देचे मंदिर आहे.
आयएएस, आयपीएस, पी ए आय,सैन्य दल, शिक्षक होण्याचा मनोदय येथे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी बोलून दाखविला.या वाचनालयाचा उपयोग भविष्यात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा यासाठी इतर विद्यार्थ्यांना प्रवृत्त करण्यास प्रयत्नशील असे मनोदय अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी व्यक्त केले .