राज्य शासन आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रो गोविंदा २०२३ या स्पर्धेला उपस्थित स्पर्धेत सहभागी. ★ झालेल्या गोविंदांशी मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधून त्यांचा उत्साह वाढवला.



राज्य शासन आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रो गोविंदा २०२३ या स्पर्धेला उपस्थित स्पर्धेत सहभागी.



★ झालेल्या गोविंदांशी मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधून त्यांचा उत्साह वाढवला.



नवी मुंबई प्रतिनिधी : दशरथ कांबळे



मुबंई : प्रो कबड्डी प्रमाणेच यावर्षीपासून प्रो गोविंदा ही स्पर्धा राज्यात सुरू झाली असून आपल्या मातीमधील या खेळाला सर्वदूर पोहचवण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले. 



वरळीत पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या प्रो-गोविंदा या स्पर्धेसाठी यापुढे बॉलिवूड अभिनेते अभिषेक बच्चन हे ब्रँड ऍम्बेसिडर असतील असे यावेळी बोलताना घोषित केले. 


राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर सणांवरील सर्व निर्बंध आम्ही दूर केले असून दहीहंडी, गणपती, दिवाळी, नवरात्र हे सगळे सण निर्बंधमुक्त वातावरणात साजरे करण्यासाठी मुभा दिली होती यंदाही त्याच उत्साहात आणि निर्बंधमुक्त वातावरणात हे सण साजरे केले जातील अशी ग्वाही यावेळी बोलताना दिली. 


गोविंदा या खेळाचा साहसी खेळात समावेश करण्यात आला आहे. त्यासोबतच मृत अथवा जखमी होणाऱ्या गोविंदांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यासोबतच यंदा पहिल्यांदाच राज्यातील ७५ हजार गोविंदांना विमा कवच देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. एवढच नव्हे तर दहीहंडीच्या दिवशी सुट्टी जाहीर करण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला असल्याचे यावेळी बोलताना सांगितले. 


यासमयी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, पर्यटन आणि पर्यावरण मंत्री मंगलप्रभात लोढा, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन,आमदार प्रताप सरनाईक, मा.आमदार रवींद्र फाटक, माजी नगरसेवक आणि प्रो-गोविंदाचे आयोजक पूर्वेश सरनाईक आणि मुंबईच्या कानाकोपऱ्यातून आलेली अनेक गोविंदा पथके उपस्थित होती.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !