सक्षम देशासाठी उत्तम नागरिकांची गरज : तहसीलदार उषा चौधरी चे 'एकदिवसीय युवक आणि लोकशाही' या युवा संवाद कार्यक्रमातील प्रतिपादन.

सक्षम देशासाठी उत्तम नागरिकांची गरज :  तहसीलदार उषा चौधरी चे 'एकदिवसीय युवक आणि लोकशाही' या युवा संवाद कार्यक्रमातील प्रतिपादन.


एस.के.24 तास


ब्रह्मपुरी : (अमरदीप लोखंडे - सहसंपादक) दिनांक,02/08/2023  भारत देशाच्या प्रगतीत अनेक संत,महापुरुष,सामाजिक विचारवंत व उत्तम नागरिक यांचा खूप मोलाचा वाटा आहे.हा देश महापुरुषांच्या विचारांचा देश आहे.या देशात सांसदीय लोकशाही आहे. लोकशाहीच्या मार्गाने देशाचा विकास होत आहे. परंतु याच ठिकाणी थांबायचे नाही तर देशाला महासत्ता बनविणे याकरिता देशाला सक्षम नेतृत्वाची गरज आहे. 


हे नेतृत्व आपल्या देशातील युवकांना करायचे आहे. नेतृत्व करण्यासाठी आजचा युवक हा सक्षम होणे आवश्यक स्वतः जोपर्यंत सक्षम होत नाही. तो पर्यंत उत्तम नागरिक बनता येणार नाही. आणि मग  या देशाचे योग्य नेतृत्व करता येणार नाही. 


हे नेतृत्व करण्यासाठी युवकांनी महापुरुषांचे विचार आत्मसात करावे. त्यातून प्रेरणा घ्यावी.तरच देश अजून सक्षम होईल असे मौलिक विचार यावेळी श्रीमती उषा चौधरी यांनी नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय, ब्रम्हपुरी आयोजित राष्ट्रीय सेवा योजना , लोकशाही साक्षर अभियान व महसूल विभागाच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले. 


यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ डी एच गहाणे, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित श्री विजय सयाम,नायब तहसीलदार, श्री राठोड नायब तहसीलदार, श्री पर्वते, निवडणूक विभाग डॉ प्रकाश वट्टी रासेयो, विभागिय समन्वयक,डॉ वर्षा चंदनशिवे, डॉ विवेक नागभिडकर,प्रा अभिमन्यू पवार व रुपेश वाकोडीकर,इ. मान्यवर होते. याप्रसंगी डॉ.डी.एच. गहाणे यांनी,लोकशाहीत तुमच्या एका मताला मूल्यं आहे. पारदर्शक कारभारासाठी चांगले सरकार निवडून देणे हेच नागरिकांचे कर्तव्य आहे. असे विचार मांडले. तर श्री विजय सयाम यांनी मतदान करण्यासाठी मतदार यादीत नाव नोंदणी करणे गरजेचे आहे. एक-एक मताला खूप महत्व आहे. असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ प्रकाश वट्टी तर सूत्रसंचालन प्रा अभिमन्यू पवार यांनी केले व आभार डॉ विवेक नागभिडकर यांनी मानले. कार्यक्रमाला विशेष उपस्थित डॉ रेखा मेश्राम, डॉ धनराज खानोरकर, डॉ भास्कर लेनगुरे होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विक्रम मानकर पंकज ढोरे,कु. मयुरी व गणेश धनजुळे यांनी परिश्रम घेतले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !