दुचाकी ची एस.टी.बस ला धडक दुचाकी चालक जखमी.
नरेंद्र मेश्राम - जि.प्र.भंडारा
भंडारा : लाखांदूर शिवाजी टी पॉइंट चौकातून वळण घेत असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसला मोटारसायकलने धडक दिल्याने मोटारसायकल चालक गंभीर जखमी झाल्याची घटना २३ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजताच्या दरम्यान लाखांदूर येथे घडली. या दुर्घटनेत राहुल श्रीराम ढोरे वय २३वर्ष रा. चप्राड असे जखमीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, राहुल हा लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात आपल्या नातेवाईकाला बाळ झाल्याने तो बघण्याकरिता २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी उशिरा आला होता.रात्री उशिर झाल्याने राहुल हा आपल्या नातेवाईकासोबत ग्रामीण रूग्णालयात थांबला. सकाळी ६ वाजेच्या सुमारास नास्ता करुण येतो म्हणुन सचिन नाकाडे यास त्याची दुचाकी मागून गेला.
परत येताना शहरातील छत्रपती शिवाजी चौकातून लाखांदूर भंडारा मार्गावरची बस क्रमांक एम एच ४० एन ८८७१ एस टी बस ही वळन घेत असताना हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकी क्रमांक एम एच ३१ बी झेड ७०४० हे विरूद्ध दिशेने ग्रामीण रुग्णालयात जाण्याकरिता निघाले असता दुचाकीचा एसटी बसला धडक झाली या धडकेत राहुल हा जखमी झाला . या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना होताच जखमीला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदर घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा पोलीस हवालदार,गोपाल कोसरे,सुभाष सहारे यांनी केला आहे.