मातोश्री विद्यालयात '१९४२ चे आँगस्ट आंदोलन आणि राष्ट्रसंत' या विषयावर मार्गदर्शन.
★ १९४२ चा चिमूर क्रांतीचा ऐतिहासिक लढा सदैव प्रेरणा देणारा - बोढेकर
एस.के.24 तास
चंद्रपूर : आपल्या देशात समता, बंधुता आणि न्यायाचे नवे राज्य निर्माण झाले पाहिजे, त्याकरिता प्रथम इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून मुक्त झाले पाहिजे असा विचार पुढे आला आणि १९४२ ची आगष्ट क्रांतीची चळवळ मुंबईच्या अधिवेशनापासून सुरू झाली. विदर्भात तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या क्रांतिकारक गीतांनी जनमानसाला स्वातंत्र्याची प्रेरणा मिळाली.
आष्टी,यावली,बेनोडा आणि चिमूर येथे जनतेनी इंग्रजांशी केलेल्या संघर्षात शेकडो लोक शहीद झाले होते. आपल्या जिल्ह्यातील चिमूर हे गाव तीन दिवस स्वतंत्र झाले होते, हे ऐतिहासिक कार्य राष्ट्रसंताच्या क्रांतीकारी गीतांनी जनसामान्यांच्या माध्यमातून घडवून आणले, असे प्रतिपादन ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी येथे केले.
मातोश्री विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयातील सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवन शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सुर्यकांत खनके होते. तर मातोश्री विद्यालयाचे मुख्याध्यापक बंडू बिजवे, पर्यवेक्षक प्रविण रोकमवार, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक पुरूषोत्तम बसुने , कान्वहेंट विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. कल्याणी बावणे आदींची प्रमुख उपस्थिती होती.श्री.बोढेकर पुढे म्हणाले की,भारतीय राष्ट्रवादाचा उदय आणि त्यातून निर्माण झालेला भारताचा स्वातंत्र्यलढा हा केवळ ब्रिटिशांविरुद्ध नव्हता तर तो साम्राज्यवादी धोरणाविरूध्द उभारलेला व्यापक संघर्ष होता . १९४२ च्या आगष्ट क्रांतीमुळे पुढे ब्रिटिश साम्राज्याच्या विरूद्ध मोठ्या प्रमाणात आंदोलन उभे राहिले आणि १९४७ मध्ये स्वातंत्र्याचा लढा यशस्वी झाला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने बंडोपंत बोढेकर यांनी शाळेला स्वलिखित ग्रंथ भेट दिले. तर शाळेच्या वतीने मुख्याध्यापक बिजवे यांनी श्री. बोढेकर यांना ग्रंथ भेट देऊन सन्मानित केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनोहर कायडिंगे,सुनील बुटले कवडू कायडींग,भरत कुंडले, नागापुरे,आडे ,पाटील, इटनकर,मानकर,धर्मपूरीवार, गुरनुले ,डोंगरवार, पिज्दूरकर , खोब्रागडे, सोयाम, बुरांडे, मेश्राम, ठाकरे , देशमुख, सकसुळे , कोकाटे,देशभ्रतार ,तपासे, वाघमारे,वैद्य,धांडे ,धवस,पेटकर,बुर्रीवार, तुमराम आदींचे सहकार्य लाभले.