रुंदीकरणासाठी रस्त्याचे खोदकाम करून ठेवल्याने अपघाताची शक्यता ; प्रशासनाचे दुर्लक्ष. जेवनाळा - पालांदुर - मरेगाव रस्त्यावरील प्रकार.

रुंदीकरणासाठी रस्त्याचे खोदकाम करून ठेवल्याने अपघाताची शक्यता ; प्रशासनाचे दुर्लक्ष.


 जेवनाळा - पालांदुर - मरेगाव रस्त्यावरील प्रकार.


नरेंद्र मेश्राम - जि.प्र.भंडारा


भंडारा : रस्ते विकासास शासन कटिबद्ध असून अनेक योजनांचे माध्यमातून आवश्यक तो निधीही उपलब्ध करतो पण कंत्राटदाराच्या आडमुख्या धोरणामुळे नागरिकांना अकारण त्रास सहन करावा लागतो. याचा प्रत्यय मानेगाव - पालांदुर राज्य ३६१ ते मरेगाव- जैतपुर राष्ट्रीय महामार्ग ३५३ सी किलोमिटर ६९/९०० ते ७५/८५० जेवणाळा- पालांदुर - मरेगाव रस्त्यावर आला . रुंदीकरणासाठी खोदकाम करून ठेवलेल्या खड्ड्यामध्ये पावसाचे पाणी साचने तथा माती व मुरुमामुळे रस्त्यावर चिखल झाल्याने अपघाताची शक्यता तर रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यांचे कपडे खराब होत असल्याने अकारण त्रास सहन करावा लागतो. 

     

तालुक्यातून जाणाऱ्या मानेगाव ते पालांदुर राज्य मार्ग ३६१ ते मरेगाव - जैतपुर ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ सी मधील किलोमिटर ६९/९०० ते ७५/ ८५० चे रुंदीकरण व नूतनीकरणाचे काम झाले नसल्यामुळे आवागमन करणाऱ्या वाहन चालकांना अकारण त्रास सहन करावा लागत असे. अरुंद वर्दळीच्या रस्त्यामुळे काही अपघातही झाले होते.


गावकऱ्यांच्या मागणीवरून   काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना पटोले यांचे प्रयत्नाने सार्वजनिक बांधकाम विभागाने आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये या रस्त्याचे रुंदीकरण व नूतनीकरण करण्यास मंजुरी प्रदान केली . अंदाज पत्रकिय रक्कम ७ कोटी २८ लाख २१ हजार रुपये आहे . ई - निविदा पद्धतीने बांधकामाचे कंत्राट नागपूरच्या एम. ए. बिल्डर यांना देण्यात आले. यावर तांत्रिक मार्गदर्शन , देखरेख व सनियंत्रणाचे काम सार्वजनिक बांधकाम उपविभाग साकोलीचे उपविभागीय अभियंता डी. एस. मटाले यांचे मार्गदर्शनात कनिष्ठ अभियंता लुटे यांचेकडे सोपविण्यात आले आहे. 

       

किलोमिटर ६९/९०० ते ७५/८५० जेवनाळा - पालांदुर - मरेगाव ते चुलबंद नदीपर्यंतचे रुंदीकरण कामास एप्रिल २०२३ चे सुरुवातीपासूनच यंत्राच्या सहाय्याने आवश्यक त्या ठिकाणी रस्त्यालगत खड्डे खोदकाम करण्यात आले  पण पावसाळा सुरू होण्यापूर्वी अंदाज पत्रकातील तरतुदीनुसार साहित्याचा उपयोग करून बुजविण्यात आले नाही . त्यामुळे  या खड्ड्यात पावसाचे पाणी साचून अपघाताची शक्यता असते तर खोदकाम केलेली माती व मुरूम रहदारीचे रस्त्यावर  येऊन चिखल झाल्यामुळे  दुचाकी स्लीप होण्याची शक्यता नाकारता येत नाही तर आवागमन करणाऱ्यांवर चिखल उडून कपडे खराब होत असल्याने गैरसोयीचे होते . कंत्रादाराने या रस्त्याचे रुंदीकरनाचे काम शक्य तेवढ्या लवकर पूर्णत्वास नेऊन वाहन चालकासह जनतेची होणारी गैरसोय दूर करणे आवश्यक झाले आहे . 


 प्रतिक्रिया : -  

रुंदीकरणाचे खोदकामामुळे पावसाळ्यात मुख्य रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य असते . दिव्यांगाना या रस्त्यावरून प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो . जेवनाळा ते पालांदुर रस्ता रुंदीकरणाचे काम लवकर पूर्ण  करून गैरसोय टाळावी. - नरेंद्र मेश्राम - सामाजिक कार्यकर्ता,मचारणा

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !