गोसी खुर्द कालव्याच्या सदोष बांधकामामुळे पाच वर्षांपासून पिकाचे नुकसान भरपाई न मिळाल्यास १५ आगस्ट रोजी सामुहिक आत्महत्या करण्याचा इशारा.
नरेंद्र मेश्राम
भंडारा : गोसीखुर्द कालव्याच्या सदोष बांधकामामुळे मागिल पाच वर्षांपासून शेतकऱ्यांच्या शेतातील धान पिकाचे नुकसान होत आहे. मात्र याची माहिती संबंधित विभागाला देऊनही याकडे हेतू पुरस्पर दुर्लक्ष करण्यात येत असल्याने, अखेर शेतकऱ्याने न्याय व पाच वर्षाची नुकसान भरपाई देण्यात यावी .आठ दिवसात न्याय न मिळाल्यास 15 आगस्ट रोजी कुटुंबासोबत आत्महत्या करण्याचा इशारा यांनी निवेदनातून दिला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शालीकराम ब्राम्हण कर यांच्या नावावर तलाठी साजा क्र. तई (बु) मौजा तई येथील गट क्र. 109/1 आराजी 1.51 आर जमीन आहे.या जमीनीची मशागत करून आलेल्या उत्पन्नातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करित होते याच जमीनीतुन एल-३ किन्हि बोथली कालवा गेला असल्यामुळे पाटबंधारे विभाग गोसीखुर्द डावा कालवा वाही / पवनी यांनी सन२०१७ मध्ये 0.28 आर जमीन संपादन करून सन २०१८ मध्ये किन्हि एल-३ कालव्याचे बांधकाम सुरू केले.कालव्याचे बांधकाम करित असतांना बाहेरुन माती आनुन भराव करून दबाई करून कालव्याचे खोदकाम करावयाचे होते.
व त्या नंतर कालव्याच्या दोन्ही पारीवर व कालव्याच्या दोन्ही पारीतील मध्ये भागात पोटात मुरूम भरुन दबाई करून कालव्यावर गरजे प्रमाणे शेतकर्यांच्या शेतामध्ये पिकाला पाणि देण्यासाठी कालव्याच्या व शेताच्या उतारा प्रमाणे कालव्याच्या पारीववर शेतकर्यांच्या शेतातील पिकाला पाणि जाण्यासाठी आउट लेट (गेटांचे) बांधकाम केले परंतु पाणि शेतात जाण्यासाठी गेट आहे.की,शेतातून पाणि कालव्यात काढण्यासाठी (गेटांचे)बांधकाम केले.हे समजेनासे झाले आहे.
आउटलेट (गेटांचे) काम करून कालवा १००टक्के पुर्ण करुन कालव्याचा शेवटचा भाग (टेल) नदी ,नाल्यांना सोडायचे होते. परंतु कालव्याचे बांधकाम नदी,नाल्यांना न सोडता अर्धवट बांधकाम करुन शेतकर्याच्या शेतात नेऊन सोडल्यामुळे पाणि सरळ नदी, नाल्यांना वाहात न जाता अडुन राहतो त्यामुळे कालव्यामध्ये दोन अडीच फुट पाणि साचून राहात आहे. गोसीखुर्द डावा काvलवा वाही च्या अधिकाऱ्यानी कालवे तयार करित असतांना तांत्रिक बाबी न तपासता कालव्या जवळील असलेल्या शेतकर्याना न विचारता मनमर्जिने कालवे तयार करून वहीवाटी प्रमाणे असणारे नैसर्गिक पाण्याचे मार्ग बंद केल्यामुळे ९ जुलै २०१८ पासूनच मासळ वितरिकेपासून १०० ते १५० एकर जागेचे पाणि वाहात येऊन गट क्र. 109/1 मध्ये साचून राहात असल्यामुळे या शेतातील पिकाचे नुकसान होत आहे.
कालव्याच्या अपूर्ण व निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे शेत पिकाची नुकसान झाली म्हणून दोन वर्षे काहीही न करता दर वर्षी नुकसान होत आहे.हे समजल्यावर गोसीखुर्द डावा कालव्याचे कालव्याच्या सदोष बांधकामामुळे नुकसान झाली हे माहित असतांना हेतुपरस्पर सदर शेतकर्यांचे मौजा तई येथील गट क्र.109/1 मधील पीक पाण्याखाली असल्याने नुकसान भरपाई देण्याची कारवाही करण्यात यावी. अशी विनंती केली होती.मात्र तहसीलदार यांनी कारवाई न केल्याने पुन्हा पत्र लिहून पुनच्छ कार्यवाही करण्यात यावी.
मालकीच्या गट क्र. 109/1अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याचे आपले म्हणणे आहे. परंतु अतिवृष्टीमुळे ही एका शेतकर्यांची नुकसान होत.नसुन लगतच्या अनेक गावात हजारो शेतकर्यांच्या जमीनीचे नुकसान होत असते. त्यामुळे सदर शेतकर्यांची नुकसान अतिवृष्टीमुळे झाली नसल्याचे स्पष्ट सांगितले.असे असता देखील नुकसान भरपाई न देता जाणून बुजून नुकसान करीत राहिले. दर वर्षी शेतपिकाच्या नुकसानीची मागणी करून त्या अर्जावर दि.०३ नोव्हेंबर २०२२ रोजी उत्तर देतांना संदर्भीय क्र. ३ व ४ नुसार चौकशी अहवालात आपले मौजा तई गट क्र. 109/1 आराजी 1.51हे. आर. जागे लगत कोणत्याही प्रकारचे तलाव,नदी,बोळी,नाला उपलब्ध नाही.मौक्यावर पाहाणी केली असता.
मासळ वितरीकेचे बांधकाम अपुर्ण दिसत आहे.सदर गटाला लागुन किन्हि ते बोथली एल-३ कालवा वितरिकेचे बांधकाम केले आहे. संदर्भ क्र. ५ अन्वये या कार्यालयाकडून सदर जमीनी बाबत नुकसान अतिवृष्टीमुळे होत नसल्याबाबत सहाय्यक कार्यकारी अभियंता, गोसीखुर्द डावा कालवा उपविभाग क्र. ४ चकारा यांना पत्र पाठविण्यात आले होते. किन्हि ते बोथली एल-३ कालव्याच्या दोन्ही बाजूंला निचरा नाल्याचे बांधकाम केले नसल्यामुळे सदर गट नैसर्गिक आपत्ती(पुर, अतिवृष्टी)मुळे बाधित न होता.नहराच्या अपूर्ण व निकृष्ट दर्जाच्या बांधकामा मुळे नेहमी बाधित होते.
असा अहवाल दिल्या नंतरही .सदर गटातील पाच वर्षापासून झालेली शेतपिकाची नुकसान कालव्याच्या सदोष बांधकामामुळे झाली आहे.हे माहित असुन सुध्दा गोसीखुर्द डावा कालवा विभागाच्या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार करून अपुर्ण व निकृष्ट दर्जाचे बांधकाम केल्यामुळेच नुकसान होते हे सिद्ध होत आहे. आणि हि मानव निर्मित कालव्याच्या सदोष बांधकामामुळे झालेली नुकसान आहे. ०९ जुलै २०१८ पासुन कार्यकारी अभियंता, अधिक्षक अभियंता,जिल्हाधिकारी,विभागिय आयुक्त, तहसिलदार,यांना वारंवार तक्रारी करून अनेक वृत्तपत्र व वृतवाहिनीवर बातम्या प्रकाशित केल्या.
त्या बातम्याची दखल घेत शेतीचे पंचनामे केले असता. अतिवृष्टी मुळे शेतपिकाचे नुकसान होत नसून कालव्याच्या सदोष बांधकामामुळे नुकसान होत असल्याचे सिद्ध झाले आहे. मात्र या बाबीकडे गोसीखुर्द येथिल अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने मागिल पाच वर्षांपासून उत्पन्नपासून वंचित राहावे लागत आहे. पाच वर्षाची नुकसान भरपाई संबंध विभागाने द्यावी. अन्यथा 15 आगस्ट रोजी कुटुंबा सह आत्महत्या करण्याचा इशारा पीडित शेतकरी यांनी निवेदनातून दिला आहे.