आय.टी.आय.च्या प्रवेशासाठी समुपदेशन फेरी ३० ऑगस्ट रोजी.

आय.टी.आय.च्या प्रवेशासाठी समुपदेशन फेरी ३० ऑगस्ट रोजी.


एस.के.24 तास


चंद्रपूर : येथील  शासकीय  औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील  शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेच्या अंतर्गत चौथ्या फेरीअखेरीस रिक्त जागा संस्थास्तरीय समुपदेशन फेरीद्वारे भरण्यासाठी पात्र उमेदवार व नव्याने अर्ज भरलेल्या उमेदवारासाठी  समुपदेशन फेरी येत्या ३० ऑगस्ट रोजी होणार आहे.  याकरिता नोंदणी केलेल्या तसेच अप्रवेशित उमेदवारांनी औ.प्र.  संस्थानिहाय व्यवसाय निहाय रिक्त जागांचा अभ्यास करून संस्थास्तरीय समुपदेशन प्रवेश फेरीसाठी आपल्या प्रवेश खात्यात लॉगिन करून दि.२७ ते  दि.२८ आगष्ट पर्यंत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत समुपदेशन फेरीकरीता नोंदणी करावी. 


 गुणवत्ता क्रमांकानुसार आणि प्रवेशा करीता उपलब्ध जागा,  उमेदवाराची मागणी या आधारे प्रवेशांच्या जागांचे वाटप करण्यात येईल. सदर समुपदेशन प्रवेश फेरीत जागा बहाल करण्यात आलेल्या उमेदवाराने सर्व मूळ प्रमाणपत्रासह येत्या दि.  ३०/८/२०२३ रोजी  सकाळी ८ वाजेपासून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दिलेल्या मुदतीत  उमेदवारांनी प्रवेशाची प्रत्यक्ष कार्यवाही करावी,असे प्राचार्य रवींद्र मेहेंदळे यांनी कळविले आहे.


आय.टी.आय.च्या प्रशिक्षणार्थ्यांना मिळणार आता चाळीस ऐवजी पाचशे रुपये विद्यावेतन : -


I.T.I मधील प्रशिक्षणार्थ्यांचे विद्यावेतनात 40 रुपयांवरून पाचशे रुपये करण्याचा निर्णय नुकताच मंत्रिमंडळाने घेतला असून यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.तसाही  विद्यार्थ्यांचा कल अलिकडे आयटीआय कडे मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत  कमी उत्पन्न गटातील  प्रशिक्षणार्थ्यांना  या निर्णयाचा  लाभ मिळणार असून व्यवसाय प्रशिक्षणासाठी संस्थेत प्रवेश घेऊन कौशल्य प्राप्त करावे तसेच समुपदेशन प्रवेश फेरीचा लाभ घ्यावाअसे मत प्राचार्य,रवींद्र मेहेंदळे यांनी व्यक्त केले.

 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !