लोकमान्यांचे जिवन हे अनेक देशभक्त क्रांतीकारकांसाठी प्रेरणास्थान. - जयंत पिंपळापुरे.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,०२/०८/२३, स्वराज्य स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि परकिय वस्तुंना बहिस्कार या चतुःसूत्री कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक तरुणांना देशभक्तीच्या कार्यामधे सहभागी होण्याची प्रेरणा लोकमान्य टिळकांच्या अथक प्रयत्नामुळेच मिळाली म्हणून लोकमान्य टिळक हे सर्व देशभक्त व क्रांतीकारकांसाठी प्रेरणा स्थान होते. असे विचार टिळक पुण्यतिथी निमित्त जंयत पिंपळापुरे यांनी व्यक्त केले.
स्थानीक लोकमान्य टिळक वाचनालय, ब्रम्हपुरी येथे लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष वाचनालयाचे सचिव श्री दत्ताजी कात्यायण तर प्रमुख अतिथी वाचनालयाचे अध्यक्ष सतिशजी शिनखेडे होते. प्रमुख वक्ता श्री जयंत पिंपळापुरे सामाजीक कार्यकर्ते हे होते . सर्वप्रथम लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेसमोरदीप प्रज्वलन व प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाला सुरुवात झाली.
प्रास्ताविक व परीचय श्री,सतिशजी शिनखेडे तर उपस्थितांचे आभार वामणराव भुसारी यांनी मानले. कार्यक्रमाचे संचालन ग्रंथपाल राजेश देऊरकर यांनी केले. कार्यक्रमाला वाचनालयाचे कार्यकारी मंडळ,तसेच वाचक तसेच बहुसंख्येने नागरीक उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता चंद्रभान पानसे, मनिष नाकतोडे, दिपक नागरीकर यांनी परीश्रम घेतले,