दब्बा घालून बसलेल्या वाघाने केला गुरख्यावर हल्ला ; गुराखी किरकोळ जखमी.

दब्बा घालून बसलेल्या वाघाने केला गुरख्यावर हल्ला ; गुराखी किरकोळ जखमी.


एस.के.24 तास


सावली : सावली तालुक्यातील 9 कि.मी.असल्रेल्या जिबगाव येथील गुराखी रामदास बोरकुटे हे नेहमी प्रमाणे गावातील गाई- बैल चराई करण्याकरिता नेले असता. दबा घालून बसलेल्या वाघाने बोरकुटे यांच्या वर हल्ला केले असता ते किरकोळ जखमी झाले असून या घटनेची माहिती गावात मिळताच गावातील नागरिकांनी घटना स्थळावर धाव घेतली व जखमीला उपचारा करिता येथील सावली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता आणण्यात आले असून सदर व्यक्ती वर उपचार सुरु आहे.

    


वरील घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे. सदर घटनेचा पंचनामा करण्याकरिता शिर्सी बीटाचे वनरक्षक मुंडे यांनी जखमीची भेट घेत जखमीला उपचार करिता दाखल केले.त्यावळी ग्रा.पं.सरपंच पुरुषोत्तम चुदरी, उपसरपंच इंदिराताई भोयर,ग्रा.प‌‌‌.सदस्य,राकेश गोलेपल्लीवार, ग्रा.पं.सदस्य मोनिका उंदिरवाडे,ग्रामीण रुग्णालयात भेट देत तब्येतीची विचारपूस करण्यात आली त्यावेळी उपस्थित राकेश नागापुरे सुनिल किनेकार अंकुश बोरकुटे उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !