नशाबंदी मंडळाच्या जिल्हा संघटक पदी संदीप कटकरवार यांची निवड.
एस.के.24 तास
चंद्रपूर : नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात व्यसनमुक्तीचे प्रभावीपणे स्वयंस्फुर्त कार्य सुरू आहे . जनजागृतीपर पोस्टर प्रदर्शनी , लोकप्रबोधन या माध्यमातून शेकडो स्वयंसेवी कार्यकर्ते कार्य करीत आहेत. या राज्यव्यापी संस्थेच्या चंद्रपूर जिल्हा संघटक पदी गांधीवादी विचारसरणीचे तडफदार युवा कार्यकर्ते,संदीप कटकुरवार यांची निवड करण्यात आली आहे.
यापुर्वी ते या गडचिरोली जिल्ह्यात पंधरा वर्षापासून ह्या संस्थेचे कार्य करीत होते. त्यांनी तेथे मोठ्या प्रमाणात जनजागृतीचे कार्य केले आहे .आता त्यांची निवड चंद्रपूर जिल्ह्यासाठी झालेली असून त्यांना यापूर्वी राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचा राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार राष्ट्रसंत साहित्य संमेलनात प्रदान करण्यात आला होता.
हे गांधीवादी विचारसरणीचे असून सर्वोदय मंडळाशी ते जुळलेले आहे. अत्यंत निष्ठापूर्वक ते आपल्या कार्यात असून त्यांच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यात भरीव कार्य होईल.त्यांच्या या निवडीबद्दल ग्रामगीताचार्य,बंडोपंत बोढेकर,एड.राजेंद्र जेनेकर, प्रा.डॉ.श्रावण बाणासुरे,प्रभाकर आवारी, विलासराव उगे आदींनी अभिनंदन केले आहे.