मान्यवरांच्या उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न.
★ ध्येय व परिश्रमातून स्वप्नापूर्ती. - शोभाताई फडणवीस.
एस.के.24 तास
मुल : कै.रावसाहेब फडणविस प्रतिष्ठान तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा सत्कार समारंभ स्थानिक स्वामी विवेकानंद विदया मंदिर येथे मान्यवरांचे उपस्थितीत दि.१२ ऑगष्ट ला सकाळी १० वाजता संपन्न झाला.या कार्यक्रमाचे आयोजन स्वामी विवेकानंद विदया मंदीर मूल तफै करण्यात आले होते.
एच.एस.सी. परिक्षेत उत्तीर्ण गुणवंताचा सत्कार ,तालुक्यातील आय.आय.टी व निट परिक्षेत यशवी होऊन तालुक्याचा गौरव वाढविणाऱ्या विदयार्थी यांचा सत्कार संपन्न झाला.
या सत्कार समारंभाचे अध्यक्षस्थानी माजी मंत्री तथा संस्थाध्यक्ष शोभाताई फडणविस होत्या तर संस्थेचे पदाधिकारी तथा जिल्हा मध्यवतीं बँकेचे अध्यक्ष तथा माजी जी.प.अध्यक्ष संतोषसिंह रावत,तहसिलदार् डॉ.रवींद्र होळी,ठाणेदार सुमित परतेकी,राज्य पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष प्रा.महेश पानसे,माजी नगराध्यक्षा रत्नमाला भोयर,माजी न.प.उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, संस्थेचे सचिव,मोतीलाल टहलियानी, माजी न.प. सभापती,प्रशांत समर्थ,मुख्याध्यापिका,अल्काताई राजमलवार,अनिल संतोषवार,संजय चिंतावार उपस्थित होते.
यावेळी प्रा.महेश पानसे,तहसीलदार,डॉ.रवींद्र होळी,पोलिस निरीक्षक,सुमित परतेकी,रत्नामाला भोयर यांनी मार्गदर्शन केले.
या सत्कार समारंभाला गुण्ंवंत विदयार्थी व पालकांनी मोठया संख्येने हजेरी लावली होती. प्रमाणपत्र,रोख,व स्मृतिचिन्ह देऊन गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.या समारंभाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक नितीन घरोटे यांनी केले.
यावेळी अध्यक्षीय भाषणातून मार्गदर्शन करताना माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी ध्येय व परिश्रम यातून स्वप्नापूर्ती होत असल्याचे स्पष्ट केले.
संचालन धनंजय गुरनुले तर आभारमत शिक्षक श्री.संघेल यांनी मांडले.