शा.औ.प्र.संस्थेचे सुयश : पाच प्रशिक्षणार्थ्यांची झाली बीआरओ साठी निवड.


शा.औ.प्र.संस्थेचे सुयश : पाच प्रशिक्षणार्थ्यांची झाली बीआरओ साठी निवड.


एस.के.24 तास


चंद्रपूर : येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत  एकूण २२ व्यवसायाचे प्रशिक्षण दिल्या जात आहे.  सध्या प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थांची गर्दी उसळली आहे.जिल्ह्यातील ग्रामीण भागातील  विद्यार्थी आपल्या आवडीच्या व्यवसायात प्रवेश घेतात आणि प्रशिक्षण पूर्ण करून  आपला  स्वयंरोजगार करीत असतात.


या व्यवसायापैकी पेंटर आणि गवंडी हे दोन असे व्यवसाय आहे की, ज्यात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी विशेष उत्साही नसतात.  पण ज्यांनी यात स्वयंप्रेरणेने प्रशिक्षण  घेतले त्यापैकी पाच जणांना मात्र नुकतीच शासकीय नोकरी मिळालेली आहे .  याच संस्थेतून पेंटर व्यवसायाचे  प्रशिक्षण घेतलेले शुभम कांबळे , अनिरूद्ध सोनुलकर आणि सुमित घरत या  तीन विद्यार्थ्यांची बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन मध्ये पेंटर (टेक्निशियन) या पदाकरिता निवड झालेली आहे  तर गवंडी व्यवसायाचे प्रशिक्षण घेतलेले  उद्देश मानकर आणि प्रेम खंडालकर या दोन विद्यार्थ्यांची निवड  मेसन (टेक्निकल) करिता निवड झालेली आहे.  नवयुवकांनी  या व्यवसायाकडे सकारात्मक दृष्टीने पहावे.


आणि या व्यवसायाचे पूर्ण प्रशिक्षण घेतल्यास सरकारी नोकरीचीही निश्चितपणे संधी मिळू शकते  , हे पुन्हा एकदा सिद्ध झालेले आहे. तसेच   मेसन आणि पेंटर हे दोन्ही एक वर्षीय ट्रेड स्वयं रोजगारासाठी देखील फार उपयुक्त आहे करिता विद्यार्थ्यांनी यात  प्रवेश घेतल्यास त्यांना सरकारी नोकरी किंवा स्वयंरोजगार करण्याच्या अनंत संधी उपलब्ध असतात .    ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या आणि व्यवसाय प्रशिक्षण घेऊन इच्छिणाऱ्या  नवयुवकांसाठी हे ट्रेड म्हणजे त्याला मिळालेली सुवर्णसंधी आहे असे प्रतिपादन संस्थेचे प्राचार्य रवींद्र मेहेंदळे यांनी केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !