ब्रम्हपुरी तालुक्यात ई-शिधापत्रिका चा भव्य शुभारंभ.

ब्रम्हपुरी तालुक्यात ई-शिधापत्रिका चा  भव्य  शुभारंभ.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक.


ब्रम्हपुरी : दिनांक,१९/०८/२३ राज्यात आता यापुढे ऑनलाइन स्वरूपाचे ई- रेशन कार्डच  मिळणार आहे.आता नवीन  रेशन कार्डची मागणी झाली किंवा त्यात काही दुरुस्ती करण्याची वेळ आली तर यापुढे ई -रेशन कार्ड दिले जाणार आहे.यामुळे केशरी व पिवळ्या रंगातील पारंपारिक राशन कार्ड टप्प्याटप्प्याने बंद होणार आहे. 


या प्रणालीमुळे नागरिकांना नवीन रेशन कार्ड करिता अर्ज करणे,रेशन कार्डात नाव समाविष्ट करणे , नाव कमी करणे,पत्ता बदल करणे ही कामे आता घर  बसल्या मोबाईल वरून किंवा सीएससी सेंटर वरून होणार आहे.या प्रणाली द्वारे वेळ, श्रम, पैशा ची  बचत  होणार आहे.ब्रह्मपुरी तालुक्यात ई -रेशन  कार्ड वितरित करण्याचा  शुभारंभ  मा. उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी मा. संदीप  भस्के, श्रीमती उषाताई चौधरी  तहसीलदार ब्रह्मपुरी,  आर्शिया जुही मुख्याधिकारी नगरपरिषद,श्री प्रविण राऊत निरीक्षण अधिकारी  ब्रम्हपुरी,जयंत मडावी दुय्यम निबंधक ब्रम्हपुरी यांचे  हस्ते करण्यात आला.


यावेळी पुरवठा  विभागातील अमित कांबळे, सपन  गड्डमवार, श्री दिलीप मेश्राम उपस्थित होते.यावेळी श्री पराग  राऊत,उर्मिला फाये,खेमा चोकेश  नाकतोडे,विठ्ठल हटवार यांचे  सह बारा कार्ड धारकांना  ई - शिधापत्रिका  वितरित करण्यात आल्या.    


या कार्यक्रमाप्रसंगी तालुक्यातील रेशन  कार्ड धारकांना आव्हाहन करण्यात आले की , महाफूड  वेबसाईट वरिल  ई- शिधापत्रिका  प्रणाली चा  लाभ  घेण्यात यावा.  ई- शिधापत्रिका  करीता  अर्ज करताना  कुटुंबप्रमुखांचा  आधार  कार्ड मोबाईल क्रमांक लिंक असणे अनिवार्य आहे.

या संबधी  तालुक्यातील CSC सेंटर  व महा ऑनलाईन सेंटर ला प्रशिक्षण देण्यात आलेले  आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !