राष्ट्रीय शैक्षणिक धोरण देशाच्या हितासाठी डॉ,सुभाष शेकोकर पोस्टर प्रदर्शनी.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,१/८/२३ या वर्षीपासून पदव्युत्तर विभागातील अभ्यासक्रमात नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यात येत आहे.विद्यार्थांना केंद्रस्थानी ठेवून हा अभ्यासक्रम आखला गेला आहे.यात अनेक बाजूंनी विचार करण्यात आलेला असून हे धोरण राष्ट्रहिताचे, देशहितासाठी असणार असल्याचे प्रतिपादन शारिरीक विभाग संचालक, डॉ सुभाष शेकोकरांनी केले.ते येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात राष्ट्रीय छात्रसेनेतर्फे ' राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० पोस्टर प्रदर्शनी ' कार्यक्रमात बोलत होते.कार्यक्रम प्राचार्य डॉ,डी.एच गहाणें च्या मार्गदर्शनात घेण्यात आला.
या प्रसंगी कनिष्ठ महाविद्यालय संचालक प्रा,मेजर विनोद नरड,मराठी विभागप्रमुख डॉ,धनराज खानोरकर,छात्रसेनेचे महिला प्रभारी डॉ कुलजित शर्मा,प्रा अभिजित परकर्लेवार, डॉ ज्योती दुपारे, डॉ युवराज मेश्राम,डॉ पद्माकर वानखडे इ.मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी पाहूण्यांचेही मार्गदर्शन झाले.पोस्टर प्रदर्शनीतून तीन क्रमांक निवडण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन, आभार हिमानी पारधीने केले.छात्रसेनेचे बहुसंख्य विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.